– माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी दिले घटनास्थळी भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : मुख्यालया पासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या देवलमारी, मोद्दूमतुरा येथील अमित नागूलवार- पराग आईलवार- महेश लेकूर या तिघांनी मिळून सुमारे १७६ क्विंटल कापूस वेचणी करून शेतात ठेवले होते. कापूसला अचानक पने आग लागल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड नुकसान झाले आहे. यात २० लाखांचा कापूस जळून खाक झाली आहे. १४ जानेवारीला दुपारी हे तिघे कापूस वेचणीच्या कामात मग्न होते. याच वेळी शेतातील कापसाच्या तिन्ही जागी आज्ञातांनी पेटवून दिल्या. धुराचे लोळ दिसल्यावार तिघांनी धाव घेतले.
ही घटनाची माहिती परिसरातील आविसं- काँग्रेसचे कार्यकर्त्यांन कडून तसेच नागरिकान कडून आविसं- काँग्रेस नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना सांगतच अजय कंकडालवार यांनी नगरपंचायत अहेरी येथील अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे घटनेची माहिती दिले. अधिकाऱ्यांनी अग्निशमन वाहन तात्काळ घटनेच्या ठिकाणी पाठवून दिले.
माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी घटनेना स्थाळी धाव घेऊन. घटनेची माहिती जाणून घेतले व दूरध्वनी वरून घटनेचे माहिती एस.डी.एम. आणि उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना सांगून लवकर लवकर पंचनामे करून. या शेतकऱ्यांना शासन कडून मदत करण्यात यावी म्हणून सांगितले.
यावेळी उपस्थित सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतु मडावी, अजय नैताम माजी जि.प. सदस्य, वैभव कंकडालवार ग्रा.प. उपसरपंच इंदाराम, सुधाकर तिम्मा तालुका अध्यक्ष आविसं भामरागड, गुलाबराव सोयाम माजी सरपंच इंदाराम, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, स्वप्नील मडावी सामाजिक कार्यकर्ते, नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवरसह आविसं- काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक होते.