विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर आणि विधिमंडळात संघर्ष करतांनाच सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष आहे. त्यातूनच गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण गावांमध्ये मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यासाठीही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री जराते यांनी केले.
शेतकरी कामगार पक्ष रायगडच्या महिला नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या सहकार्याने आयोजित मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिरांची सुरुवात करण्यात आले. गडचिरोली तालुक्यातील मौजा पुलखल येथून सुरुवात करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सावित्री गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच रुमन कोटगले, सदस्य तुकाराम गेडाम, खुशाल ठाकरे, जेष्ठ नागरिक सितकुरा जराते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गिरिधर ठाकरे, शेकाप गाव शाखेचे सहचिटणीस भास्कर ठाकरे यांची उपस्थिती होती.
डोळे तपासणी नंतर महिला नेत्या जयश्री जराते, जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, युवक जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर यांच्याहस्ते ४७ नागरिकांना चष्मे, ३४ नागरिकांना औषधीचे मोफत वाटप करण्यात आले. शिबिरादरम्यान मोतीबिंदूचे ३२ रुग्ण आढळून आले असून त्यांचेवर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे.
शिबिरादरम्यान गडचिरोली जिल्हा रुग्णालयातील निवृत्त डॉ. नानाजी मेश्राम यांनी डोळे तपासणी केली. तर खाजगी समुपदेशक धनपाल शेंडे, महेंद्र जराते, बादल दुधे, आकाश आत्राम, वैभव भोयर यांचेसह कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.