Latest Posts

पेन्शन केस संबंधाने प्रोसिस दाखल करण्याकरीता लाच रक्कम मागणी करणाऱ्या प्राथमिक शाळा सचिवास अटक 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : पेन्शन केस संबंधाने प्रोसिस दाखल करण्याकरीता प्राथमिक शाळेचे सचिव याला ६ लाख रूपयाचे लाच रक्कम मागणी करण्याकरिता अटक करण्यात आले.

विजय श्रावण वाटकर (६८) सचिव, सेन्ट विसेन्ट उच्च प्राथमिक शाळा उदय नगर मानेवाडा रिंग रोड, नागपूर रा. वाटक्कर पॅलेस, भोसला वेध शाळेच्या बाजुला लकडापुल नागपूर शहर असे आरोपीचे नाव असून १ मार्च २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२४ चे ११.३६ ते १४.४५ वा. दरम्यान सदर कार्यरत ठिकाणी मागणी केले.

माहितीनुसार, तकारदार यांनी २० फेब्रुवारी २०२३ रोजी तकार दिली. तक्रारदार हे ईलोसे यांचे शाळेतून नियमित वयोमानाने सन २०१८ ला सेवानिवृत्त झालेले. हे सेवा निवृत्त होवुन सुध्दा ईलोसे यांनी त्यांचे पेन्शन केस संबंधी कोणतीही कारवाई केली नाही. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सदर याचिकेवर तत्कारदार यांचे पेन्शन केस संबंधाने तकारदार यांच्या बाजुने प्रोसिस दाखल करण्याकरीता सापळा पडताळणी दरम्यान ईलोसे यांनी रूपये ६ लाख लावेची मागणी करून लाच स्विकारण्याची तयारी दर्शविली.

सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी ईलोसे विजय श्रावण वाटकर यांना तकारदार यांचेवर संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्विकारली नाही. ईलोसे विजय वाटकर यांना त्यांचे कार्यालय सेन्ट विसेन्ट उच्च प्राथमिक स्कूल उदय नगर मानेवाडा रिंग रोड नागपूर येथुन ताब्यात घेवुन त्यांचे विरूद्ध पोलीस स्टेशन हुडकेश्वर नागपूर शहर अप. क. १२२/२०२४ कलम ७ च प्र. अधि. १९८८ (सुधारणा -२०१८) अन्वये दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयात ईलोसे यांना अटक करण्यात आलेली आहे

ईलोसे विजय वाटकर यांच्या घराची घरझडती घेतली असता घरझडती दरम्यान रोख रक्कम ६८ लाख मिळून आल्याने सदरची रक्कम तपासकामी जप्त करण्यात आली.

सदरची कार्यवाही राहुल माकणीकर, पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर परिक्षेत्र, संजय पुरंदरे अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, सचिन कदम अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष चौधरी, पो.नि. वर्षा मते, सफौ. सुरेंद्र सिरसाट, पोहवा अनिल बहीरे, नापोल, अमोल मॅघरे, मनोपअ, अस्मिता मल्लेलवार, मपोहवा आशु श्रीरामे, चालक मपोशि हर्षलता भरडकर यांनी पार पाडली.

Latest Posts

Don't Miss