Latest Posts

पेरमिली येथे पारंपरिक दसरा उत्सवात राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते विधीवत पूजन

– ५१ गावांतील आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती.
– आदिवासी समाज संघटित होणे काळाची गरज : राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे प्रतिपादन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या अहेरीचा दसरा झाल्यावर येथील ज्योत नेऊन अहेरी इस्टेटमधील अनेक आदिवासी पट्टीत आदिवासी बांधव दसरा उत्सव साजरा करतात. त्याच परंपरेप्रमाणे अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा हस्ते विधीवत पूजन करून मोठ्या उत्साहात आदिवासी बांधवांनी काल दसरा साजरा केला. यावेळी पेरमिली पट्टीतील ५१ गावांतील आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आदिवासी बांधवांना संबोधित करतांना राजे मनाले आदिवासी समाज हा देशातील मुळ निवासी आहे. आपल्या क्षेत्रातील जल, जंगल, जमीनीवर त्यांचा पहिला अधिकार आहे. त्यामुळे आदिवासी समाजाने आपसातील मतभेद दूर करून एकत्रित येणे ही काळाची गरज आहे. असे झाल्यास आपल्या समाजाचा प्रगती कोणीही रोखू शकनार नाही, असे प्रतिपादन राजेंनी यावेळी केले. तसेच आपल्या क्षेत्राचा विकासासाठी कटिबद्ध आहे. कोणालाही काहीही समस्या असेल त्यांनी निःसंकोच माझ्याकडे यावे सर्वांचे समाधान करणे ही या इस्टेटचा राजा मनून जबाबदारी आहे असेही पुढे राजे बोलले.

रात्री आदिवासी पारंपरिक नृत्य तथा गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच राजेंचा मार्गदर्शनाने परंपरागत दसरा उत्सवाचा समारोप झाला.

यावेळी पेरमिली पट्टीतील शेंड्या, गाव पटेल, गाव भूमिया ह्या सह परिसरातील ५१ गावांतील आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Latest Posts

Don't Miss