Latest Posts

पेरमिली अंतर्गत मेडपल्ली येथे धान खरेदी उपकेंद्र व धान खरेदीदार सहायक पद मंजूर करा : माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार

– माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील पेरमिली अंतर्गत येत असलेल्या मेडपाल्ली येथील आदिवासी विविध सहकारी संस्था पेरमिली येते धान खरेदी केंद्र असून पेरमिली या क्षेत्रा मध्ये एकूण ४० ते ४५ गावे येतात त्यामुळे शेतकऱ्यांचा धान पीक करत असतात. खरेदी केंद्रावार १० ते १५ दिवस मुक्काम करावा लागत आहे. या १० ते १५ दिवसांमध्ये खूप अडचणीच निर्माण कराव लागत आहे.

धान खरेदी पेरमिली येते धान विक्री करण्यासाठी या ४० ते ४५ गावांचे अंतर सुद्धा लांब असल्यामुळे शेतकऱ्यांना धान खरेदी धान अनण्यासाठी खूप अडचण निर्माण होत आहे. आणि गौरसोय टाळण्यासाठी पेरमिली अंतर्गत मौजा मेडपाल्ली येते धान खरेदी उपकेंद्र सुरु झाल्यास.मेडपाल्ली अंतर्गत १० ते १५ गावांना धान खरेदी विक्री करण्यासाठी सोईचे होईल. धान खरेदी केंद्राचा अनंतर जवळ होईल अशी मेडपाल्ली येथे धान खरेदी करण्यासाठी सोईसुविधा उपलब्ध आहे.त्याकरिता मेडपाल्ली येते धान खरेदी उपकेंद्र व नवीन धान खरेदीदार सहाय्यक यांची निवड करण्यात यावी म्हणून. आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली.

यावेळी प्रमोद आत्राम माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पेरमल्ली, निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली, मारोती पेंदाम, महेश वेलादी, तुळशीराम मडावी, भगवान मडावी, चंद्रशाई मेश्राम, प्रभाकर सडमेक, दीपक मेश्राम, बंगरू मडावी, संदीप मडावी, नानाजी मडावी, लक्ष्मण तलांडे, सुनील मेश्राम, अक्षय आत्राम, विश्वनाथ आत्राम, युवराज मेश्रामसह आविसं अजयभाऊ मित्र परिवार पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतर शेतकरी वृंद उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss