– श्रम हा प्रत्येकाचा संस्कार झाला पाहिजे : प्राचार्य डॉ. खंगार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा, संचालित फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली, अंतर्गत एन.एस.एस. विभागाच्या वतीने एम.एस.डब्ल्यू. व बी.एस.डब्ल्यू. नुकतेच जि.प. उच्च प्राथमिक शाळा जांभळी येथे २६ जानेवारी २०२४ ते १ फेब्रुवारी २०२४ कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय विशेष श्रम संस्कार (Special Labor Sanskar) व ग्रामीण शिबिराचा (rural camp) उद्घाटन सोहळा २७ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाला.
याप्रसंगी सर्वप्रथम शिबिराची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व मालार्पण करून करण्यात आली.
यानिमित्याने, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य सुरेश के. खंगार हे उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून प्रदीप पाटील उसेंडी, सरपंच ग्रामपंचायत जांभळी हे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विवेक गोर्लावार गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य व सिनेट सदस्य, डॉ. रुपेंद्र कुमार गौर गोंडवाना विद्यापीठ सिनेट व मा. विलास कुंभरे माजी सरपंच, कुणाल उसेंडी पोलीस पाटील, दर्शना बाळेकमकार शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्ष, ममता पुजलवार आशा वर्कर, रंजना कतलामी ग्रामपंचायत सदस्य जांभळी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. खंगार यांनी श्रम हा प्रत्येकाचा संस्कार झालाच पाहिजे तरच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन एक सज्जन नागरिक बनता येते. तसेच शिबिरार्थी व गावकरी यांच्या समन्वयातून गावाचा विकास साधता येते, असे मत व्यक्त केले. तसेच याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचाही समाज समायोचीत भाषणे झालीत. यानंतर शिबिरार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. दिपक तायडे यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा. सुरेश कंती यांनी केले. तर उपस्थित त्यांचे आभार प्रा. हितेश चरडे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी, ग्रंथालय कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी, समस्त गावकरी व बी.एस.डब्ल्यू. व एम.एस.डब्ल्यू. मधील सर्व शिबीरार्थी उपस्थित होते.