Latest Posts

पाईप फुटल्याने नाल्यातील पाणी जातोय पिण्यास : साखरी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सावली (savli) : सावली तालुक्यातील साखरी येथे गाव तलावाजवळ पाईप फुटल्याने तलावातील पाणी साखरी वासियांना जात असल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. या सदर बाबीकडे ग्रामपंचायत चे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

मागील मे महिन्यात पाईप फुटल्याने गावातील युवक मनोज झबाडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पाईप फुटलेल्या जागेवर स्वतः ट्युब पट्टा आणून तात्पुरत्या स्वरूपात बांधुन ठेवले होते. मागील महिन्यात परत ते पाईप लीक होऊन नाल्यातील दुषित पाणी पिण्यास जात आहे. सदर बाब मनोज झबाडे यांनी ग्राम पंचायत च्या लक्षात आणून देऊनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे साखरी येथील गणेश नगर येथील लोकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथ रोगाने थैमान घातला आहे. सर्दी, खोकला, ताप आदी आजाराने आरोग्यवर्धिनी केंद्रात गर्दी पहावयास मिळत आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रात अगोदरच स्टाफ कमी असताना दूषित पाण्यामुळे अतिसार, उल्टी अशा आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. तरी सदर पाईपचे काम लवकरात लवकर करून स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे, अशी मागणी साखरी येथील नागरिक करीत आहेत.

Latest Posts

Don't Miss