– पुजई ता. जि. वर्धा येथे अर्थसंकल्पीय निधी अंतर्गत पुजई-करंजी मुख्य रस्त्यावरील पुलाचे कामाचे (रु.२.५० कोटी) भुमीपूजन कार्यक्रम संपन्न.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : गावाचा कायापलट व्हावा, अशी मनोमन सर्वांची ईच्छा असते व प्रयत्नही करतो परंतु परिपूर्ण माहिती, अभ्यास व पाठपुरावा नसल्यामुळे ईच्छा असून सुद्धा गावास न्याय देवू शकत नाही. कुठल्याही कामाची सुरुवात करण आणि ते काम तडीस घेवून जाण सोप नसते, येथील सरपंच तसेच अतुल देशमुख यांनी विकास कामाला महत्व देवून पाठपुरावा करुन अनेक कामे मंजुर तसेच महत्वाचा असलेला पुजई-करंजी मुख्य रस्त्यावरील पुलाचे काम मंजुर करण्यासाठी अनेक वेळी माझी भेट घेतली व सदर काम अर्थसंकल्पात मंजुर झाले, काम तडीस नेले केली आहे, विकासकामाच्या माध्यमातून गावाचा चेहरा मोहरा बदलत असतो. नियोजनबद्ध कार्यशैलीने काम केल्यास गावाचा विकास करणे शक्य आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त केले.
पुजई ता.जि. वर्धा येथे अर्थसंकल्पीय निधी अंतर्गत पुजई-करंजी मुख्य रस्त्यावरील पुलाचे कामाचे(रु. २.५० कोटी) भुमीपूजन कार्यक्रम खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी राजेश बकाने, प्रमुखे पाहुणे म्हणनू सुनिल गफाट, मिलींद भेंडे, अतुल देशमुख, सरपंच रुपाली प्रफुल देशमुख, जयंत कावळे, नंदकिशोर झोंटींग, किशोर चौधरी, महेश देवढे, संदिप राऊत उपस्थित होते.
यावेळी राजेश बकाने, सुनिल गफाट, सरपंच रुपाली प्रफुल देशमुख यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक मिलींद भेंडे व संचालन सतिश बाबुळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अतुल देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला उपसरपंच शंकर सेलकर, ग्रा.प. सदस्य अर्चना गणेश आडे, देवानंद टमगीरे, विठ्ठल ठाकरे, दिपक टमगीरे, प्रकाश राऊत, मुरलीधर भोमले, राजु मसकर, नरेश पोटफोटे, बबन मुंगले, ज्ञानेश्वर राऊत, बाबा चौधरी, दशरथ भोंडे, कमलाकर देशमुख व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.