Latest Posts

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण व फास्टफुडचे प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारोप संपन्न

– १०० प्रशिक्षणार्थीनी घेतले पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण तर २८ पशिक्षणार्थीनी घेतले फास्टफुडचे प्रशिक्षण
– जिह, मेहनत आणि आत्मविश्वासाने पोलीस भरतीला सामोरे जा : अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्हयातील गरजु युवतींना पोलीस दलात रोजगाराची संधी देवून नोकरी मिळविणे करीता आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील युवकांकरीता पोलीस भरती पूर्व निवासी प्रशिक्षणाचे व फास्टफुडचे प्रशिक्षणाचे आयोजन गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे करण्यात आले होते. सदरचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने प्रशिक्षणार्थीचे निरोप समारंभ कार्यक्रम एकलव्य धाम, गडचिरोली येथे पार पाडण्यात आला.

सदर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण ११ मार्च २०२४ ते १० एप्रिल २०२४ पर्यंत एकूण ३० दिवसांचे निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने मैदानी चाचणी व लेखी परीक्षा याबाचत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या ०९ व्या सत्रामध्ये १०० युवकांनी आपला सहभाग नोंदवला होता. आतापर्यंत घेण्यात आलेल्या पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रहीवासी असलेल्या एकूण १ हजार ४६२ युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदविला आहे. यामधुन १३२ जणांची पोलीस/एसआरपीएफ मध्ये निवड झाली आहे. काल १० एप्रिल रोजी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण पूर्ण झाल्याने प्रशिक्षण घेतलेले १०० युवक प्रशिक्षणार्थी निरोप समारंभ कार्यक्रमात हजर होते. या प्रशिक्षणादरम्यान सर्व उमेदवारांना गडचिरोली पोलीस दलाचे वतीने लोअर, टी-शर्ट, शुज, लेखी परीक्षेकरीता आवश्यक अभ्यासक्रमाची पुस्तके व इतर आवश्यक साहित्य मोफत वितरीत करण्यात आले. तसेच यशस्वीरीत्या प्रशिक्षण पुर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले. यादरम्यान उमेदवारांनी पोलीस भरतीमध्ये यशस्वी होण्याचे मनोगत व्यक्त केले.

यासोबतच गडचिरोली पोलीस दल व बिओआय आरसेटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेल्या फास्ट फुड प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील रहीवासी असलेल्या एकुण २८ युवक-युवतींनी फास्ट फुड प्रशिक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. काल १० एप्रिल रोजी फास्ट फुड प्रशिक्षण पूर्ण झाल्याने प्रशिक्षण घेतलेले २८ युवक-युवती प्रशिक्षणार्थी निरोप समारंभ कार्यक्रमात हजर होते. तसेच यशस्वीरीत्या प्रशिक्षण पुर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण करण्यात आले. या दरम्यान प्रशिक्षणाथ्यर्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आपल्या परिसरामध्ये फास्ट फूड व्यवसाय उभारून स्वतःचे जिवनमान उंचवू, असे सांगितले. तसेच उमेदवारांनी सदरचे प्रशिक्षणाची संधी गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले आहे.

सदर समारोपीय कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक कुमार चिता यांनी प्रशिक्षणार्थीना आगामी पोलीस भरतीमध्ये जिद्दीने, मेहनतीने आणि चिकाटीने परिश्रम करुन यश संपादन करण्याचा संदेश दिला. तसेच पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना भरतीसंदर्भाने काहीही गरज पडल्यास गडचिरोली पोलीस दल मदतीसाठी व मार्गदर्शनासाठी सदैव पाठीशी राहणार, यासोबतच फास्टफुड प्रशिक्षणार्थी यांनी रेस्टॉरंट, हॉटेल व्यवसायात पूढे यावे असे सांगितले. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम बीओआय आरसेटी, गडचिरोली हे उपस्थित होते.

सदर निरोप समारंभाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/ उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील, पोउपनि. शेळके, सर्व पोलीस अंमलदार व कवायत निर्देशक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss