Latest Posts

पोलिस स्टेशन आसरअल्ली तर्फे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांची जयंती व जागतिक आपत्ती निवारण दिवस साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : आज १५ ऑक्टोंबर २०२३ रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वाचन प्रेरणा दिन व आपत्ती व्यवस्थापन रॅली असे दोन्ही कार्यक्रम एकत्र साजरे करण्यात आले.

पोलीस स्टेशन आसरअल्लीच्या वतीने पोलीस स्टेशन स्तरावर एक तास वाचनाकरता वाचाल तर वाचाल या उपक्रमाचे आयोजन प्रभारी अधिकारी समाधान दौड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा पोलीस व एस.आर.पी.एफ चे अंमलदार यांनीही सहभाग नोंदवला.

गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातून वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून, एक तास वाचनाकारिता यशोधन टेस्ट सिरिज मुंबई, यांच्या सहकार्याने पोस्टे हद्दीतील विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परिक्षा सराव पेपर घेण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापन निमित्य भव्य रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये श्रीनिवास हायस्कूल अंकिसा तसेच धर्मराव हायस्कूल असरअल्ली चे विद्यार्थी/विद्यार्थिनी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

सदर रॅलीला पोलीस स्टेशन असरअल्ली येथून सुरूवात करून असरअल्ली गावातून घोषणा देत पूर्ण करण्यात आली. पोलीस स्टेशन असरअल्ली येथे उपस्थित विद्यार्थी/विद्यार्थिनी यांची निबंध स्पर्धा उत्साहात पार पडली. त्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक काढण्यात येणार असून त्याचे वितरण प्रभारी अधिकारी समाधान दौड हे समक्ष शाळेला भेट देऊन करणार आहेत.

नमूद उपक्रमा दरम्यान प्रभारी अधिकारी समाधान दौड यांनी वाचनाबद्दलचे महत्त्व तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाच्या निमित्याने मुलांमध्ये आपत्ती निवारण उपाययोजनांविषयी जागरुकता निर्माण व्हावी, त्या अनुषंगाने त्यांनी याविषयी विचार करावा, विविध माध्यमांतून माहिती संकलीत करावी व आपल्या ज्ञानाची आणि संकल्पनांची मांडणी करावी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय देशाचे ११ वे राष्ट्रपती, मिसाइल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम हे कायमच अनेकांच्या जीवनाचे प्रेरणास्थान राहिले आहेत. त्यांचा संबंध जीवनप्रवास जसा प्रेरणादायी आहे, तसेच त्यांच्या जीवनातल्या कही घटना, किस्से आपल्याला खूप काही शिकवून जातात. अशा या स्वतःसह आपल्यातल्या अनेकांचे आयुष्य घडवणाऱ्या व्यक्तीमत्वा आहे. व कार्याबाबत मार्गदर्शन केले.

उपस्थित सर्व विद्यार्थी/विद्यार्थिनी, शिक्षक वृंद तसेच अंमलदार याना नाश्त्याची सोय करण्यात आली. सदर उपक्रमाचे सूत्र संचालन पोलिस उपनिरीक्षक निखिल मेश्राम यांनी केले.

Latest Posts

Don't Miss