Latest Posts

पोलीस स्टेशन नारगुंडा येथे महिला मेळाव्याचे आयोजन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड (Bhamragad) : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने व पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक निलोत्पल, देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक अभियान, चिंता अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन, एम. रमेश अप्पर पोलीस अधीक्षक, अहेरी यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नारगुंडा येथे दादालोरा खिडकीचे माध्यमातून महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी, त्यांचे कलागुणांना वाव मिळण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी १० जून २०२४ ला भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष परि. पोउपनि चेतन ढावरे दुय्यम प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन नारगुंडा, कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख अतिथी मनीषा मज्जी CHO, तारा मडावी परीचारीका, सरीता मडावी परीचारीका, कमल पुंगाटी, नारगुंडा अंगणवाडी सेविका, करिष्मा पुंगाटी नारगुंडा आशा वर्कर तसेच परि. पोउपनि वाघोले पोउपनि नाकाडे, एस.आर.पी.एफ. मुंबई ग्रुप आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

महिला मेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब व भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महिला मेळाव्याचे प्रास्ताविक परि. पोउपनि वाघोले यांनी महिला मेळावा घेण्याचे उद्देश व महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे याबाबत माहिती दिली. त्यानंतर दुय्यम प्रभारी अधिकारी परि. उपनि चेतन ढावरे यांनी मेळाव्याला उपस्थित महिलांना पोलीस दादालोरा खिडकीचे माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती दिली. व महिला सक्षमीकरण करण्यासाठी पोलीस दलामार्फत महिलांकरिता राबविण्यात येणारे विविध प्रशिक्षण व उपक्रम याबद्दलची माहिती देण्यात आली. तसेच संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा पोलिस विभागामार्फत महिला व युवतींकरिता असलेल्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण, रोजगार मेळावा, शिलाई मशिन प्रशिक्षण इत्यादी बाबत माहिती देवून उपस्थित ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.

मेळाव्यामध्ये उपस्थित महिलांना खालील साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये- १) प्लास्टिक टोपले- ०६, २) चप्पल- १२०, ३) प्लास्टिक बॅकेट- ०८, ४) मसाले डब्बे- ०६, ५) भरण्या- ३५०, ६) साड्या- १७५.

तसेच महिला मेळाव्याच्या निमित्याने गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून कॅम्पचे आयोजन करण्यात आले. त्यात नागरिकांना खालीलप्रमाणे कागदपत्रे काढुन देण्यात आले. त्यामध्ये- १) आर.डी. बचत खाते- ०७, २) IPPB अकाऊंट- ०४, ३) पॅन कार्ड- ०७, ४) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना- ४७, ५) आभा कार्ड- ७२, ६) राशन कार्ड नविन काढणे- १९, ७) ऑनलाईन सातबारा- ३५, ८) झेरॉक्स प्रति- १ हजार १३५.

महिला मेळाव्याकरिता पोस्टे हद्दीतील ते ५३० ते ५५० महिला, पुरुष उपस्थित होते. सर्व नागरिकांकरिता उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था करून कार्यक्रमाची सांगता झाली. मेळावा शांततेत पार पडण्याकरिता ज़िल्हा पोलीस अधिकारी/अंमलदार, SRPF अधिकारी व अंमलदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Latest Posts

Don't Miss