Latest Posts

जिल्हा क्रीडा स्टेडियमचे निकृष्ट बांधकाम व कंत्राटदाराची निविदा रद्द करण्यासंदर्भात सोमवारी विधानभवनात बैठक

– आमदार डॉ. देवराव होळी यांच्या विनंतीवरून क्रीडामंत्री ना. संजय बंसोडे यांनी दिले बैठकीचे आदेश        – कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने १ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या खोट्या एमबी तयार करून बिलाची उचल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : गडचिरोली जिल्हा स्टेडियमचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असुन व बांधकाम अतिशय संथ गतीने होत आहे त्यातच कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी  संगनमताने १ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या खोट्या एमबी तयार करून बिलाची उचल केली असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली असल्याने पहिल्या टप्प्यातील विद्यमान कंत्राटदाराची निविदा प्रक्रिया रद्द करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी व दुसऱ्या टप्प्यातील निधी मंजूर करून बांधकाम  नियमित करावे, यासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या विनंतीवरून क्रीडामंत्री ना. संजय बंसोडे यांनी सोमवार १८ डिसेंबर रोजी विधान भवनात बैठक लावण्याचे आदेश दिले आहेत.

गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुल च्या पहिला टप्प्यातील कामाची १३ ऑगस्ट २०१९ रोजी २४ कोटी ३१ लक्ष रुपयाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन १८ महिन्याचा कालावधीत निश्चित करून बांधकाम सुरू झालेले आहे. परंतु सदर कामाची प्रगती खूपच मंद असल्याने ३४ महिन्याच्या कालावधीनंतरही वापरासाठी हस्तांतरित होईपर्यंत कोणतीही इमारत पूर्ण झालेली नाही. १८ महिन्यांच्या कालावधीनंतर दररोज ५००/- रुपये एवढाच कमी दंड होत असल्याने कंत्राटदाराने अजूनही मनुष्यबळ व यंत्रसामुग्री त्यात गुंतवलेली नाही. १ जून २०२३ पासून दररोज ५ हजार रुपये दंड रक्कम ठोठावूनही  कंत्राटदार शासनाच्या कोणत्याही पत्राचे पालन करण्यास प्रतिसाद देत नाही. कंत्राटदाराला फक्त कामे करण्यात व निकृष्ट दर्जाची कामे करण्यात रस असून जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ साठीही त्यांनी अशाच प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने या कंत्राटदादाला काळया यादीसाठी नोटीस बजावलेली आहे. त्यातच या कामात कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने १ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या खोट्या एमबी तयार करून बिलाची उचल केली असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

त्यामुळे कामात गैरप्रकार झाल्याने या कंत्राटदाराची निविदा रद्द करून करावी व दुसऱ्या टप्प्यातील निधी मंजूरी व बांधकाम होण्याच्या दृष्टिने आपल्या उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करावे, अशी विनंती आमदार डॉ. देवराव होळी यांनी क्रीडामंत्री संजय बंसोडे यांची विधानभवनातील दालनात भेट घेऊन केली. यावेळी मंत्री महोदयांनी लगेच सोमवारी १८ डिसेंबर रोजी बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले.

Latest Posts

Don't Miss