Latest Posts

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी असा करा अर्ज

 – योजने अंतर्गत लाभार्थी नोंदणी अभियान ३० सप्टेंबर पर्यंत सुरु

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : कृषी उत्पादनावर आधारित ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावेत. युवकांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरु केली आहे.

ही लागतात कागदपत्रे – 

अर्जदाराकडे शेतकरी गटाच्या सदस्याचे आधारकार्ड, पॅनकार्ड, इलेक्ट्रिकल बिल, जागेचा नमुना -८ आदी कागदपत्रे असावीत. ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

कोणाला अर्ज करता येईल?-

वैयक्तिक, बचत गट, शेतकरी गट, संस्था, अग्रो कंपनी यापैकी कोणालाही अर्ज करता येईल. सातबारा नसला तरी याचा लाभ घेता येणार आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे. www.pmfme.mofpi.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अशी आहे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना –

या योजनेतर्गत कच्च्या मालावर प्रक्रिया करणे  उद्योग उभारायचे आहेत. यात दोन फायदे आहेत. कच्च्या मालास ग्राहक उपलब्ध होईल. प्रक्रिया केल्याने जास्त माल विकता येईल. यामुळे स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होईल.

शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचे स्वरूप –

योजनेचा लाभ घेण्यासाठी दाखल केलेला प्रस्ताव मंजूर होईपर्यंत कृषि विभागमार्फत पाठपुरावा व मार्गदर्शन केले जाते. प्रकल्प किमतीच्या ३५% जास्तीत जास्त १० लाख रुपये शासन अनुदान देते. योजने अंतर्गत लाभार्थी नोंदणी अभियान ३० सप्टेंबर पर्यंत सुरु आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे साधा संपर्क –

तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्वयेक्षक, कृषी सहायक, जिल्हा स्तरावर जिल्हा नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी तसेच जिल्हा संसाधन व्यक्ती यांचाशी संपर्क करावा. अधिक माहितीकरिता जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाशी संपर्क करावा.

 

Latest Posts

Don't Miss