Latest Posts

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन उडविण्यास मनाई

-जिल्हाधिकाऱ्यांनी पारीत केले आदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ नोव्हेंबर ला चिमूर येथे दौरा असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच अवकाशीय उपकरणाद्वारे नियोजित संभाव्य हल्ल्याची शक्यता रोखण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत विना परवाना व बेकायदेशीर रित्या ड्रोनचा वापर करण्यास मनाई आदेश पारीत करण्यात आला आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ च्या तरतुदीन्वये चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ००:०१ वाजतापासून १२ नोव्हेंबरच्या रात्री २४:०० वाजेपर्यंत विना परवाना व बेकायदेशिररित्या ड्रोन प्रक्षेपण व ड्रोनचा वापर करण्यास जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सही व शिक्यानिशी सदर आदेश पारीत करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss