– धान खरेदी केंद्राच्या समस्या दूर करण्यासाठी ३० तारखेला मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन
– आ.विनोद अग्रवाल व आ. विजय राहांगडाले यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकड़े केली मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia) : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून बहुतांश सर्वच शेतकरी धान पिकाची लागवड करतात. अनेकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. धान पीक निघाले असून शेतकरी बांधव बाजारात धान विक्रीसाठी धावपळ करीत आहे. तसेच धान खरेदी केव्हा सुरु होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र दरवर्षी काही न काही अडचणी धान खरेदीसाठी येतच असतात. यामुळे शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
सध्या गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधाभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता ५०० पैकी ५० केंद्राला मान्येता प्रदान करण्यात आलेली आहे.
धान खरेदी केंद्र सुरू करण्यास १ कोटीचे गहाणपत्रक व २० लक्ष ठेव तसेच प्रति क्विीटंलवर १ किलो वरून अर्धा केलो घट देणे तथा ३० रू. वरून २० रू. कमीशन करणे इत्यादी जाचक अटी शर्तीमुळे शासकीय आधारभूत धान खरेदी करणा-या संस्था नी धान खरेदी करण्यास नकार दिला आहे. अश्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मुंबई मंत्रालय येथे गोंदिया विधानसभेचे आमदार विनोद अग्रवाल व तिरोडा विधानसभेचे आमदार विजय राहांगडाले यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत धान उत्पादन करणाऱ्या भागातील आमदाराची तातडीने बैठक लावून समस्या मार्गी लावण्यात याव्यात अशी मागणी केली. सोबतच जुन्याच नियमानुसार धान खरेदी केंद्रांना धानाची उचल करू द्यावी, अशी मागणी केली असता यावर मंत्री छगन भुजबळ यांनी अटी शिथिल करू असे आश्वासन आमदार विनोद अग्रवाल व आमदार विजय राहांगडाले यांना दिले.
अशा समस्या पुढे उद्भवू नये या दृष्टीने ३० तारखेला विशेष बैठकीचे आयोजन धान उत्पादक शेतकरी भागातील लोकप्रतिनिधी सोबत आयोजित करण्यात आली आहे हे विशेष.