Latest Posts

कृषी उद्योगांना चालना देणारी परिषद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– अँग्रो व्हिजन कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते यांची उपस्थिती
– अँग्रो व्हिजन कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद, सेंट्रल पॉईंट हॉटेल नागपुर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपुर (Nagpur) : मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन अँग्रो व्हिजन आहे. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राविषयी ज्ञान मिळावा व शेतकरी विकसित व्हावा. यासाठी सतत तेरावर्ष अँग्रो व्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरविण्यात महत्वाची भुमिका करित आहे.

यावर्षी चौदाव्या अँग्रो व्हिजन मध्ये शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि कृषी क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानाचा विकास यासाठी चौदाव्या ॲग्रो व्हिजन परिसंवाद कार्यशाळेचे आयोजन सेंट्रल पॉईंट हॉटेल नागपुर येथे करण्यात आले.

या कार्यशाळा परिसंवादाला ना. नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन करतांना शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील उद्योगांना चालना मिळावी, शेतकरी नवनवीन उद्योग करावा, शेतीविषयक पुरक व्यवसाय करावा, दुग्ध व्यवसाय, खारे, गोड पाण्यातील झिंगे व्यवसाय, बांबू व्यवसाय, विदर्भातील शेतकऱ्यांचा विकास कृषी क्षेत्रातील विविध उपाय योजना, शेतकरी अन्नदाता आहेच त्या व्यतिरिक्त ऊर्जा दाता ही बनला पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न केला जात आहे. तेरा वर्षात झालेल्या अँग्रो व्हिजनचे महत्त्व देत, शेतकरी आत्महत्या मुक्त करणे आहे. यासाठी होणाऱ्या चौदाव्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनी सहभागी व्हावे, असे आवाहन करत ॲग्रो व्हिजन द्वारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. असे ना. नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांविषयी महत्त्वपूर्ण विचार व्यक्त करत, उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने ना. नितीन गडकरी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व महामार्ग, खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, खासदार रामदास तळस, खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार जोगेंद्र कवाडे,आमदार आशिष जयस्वाल अँग्रो व्हिजनचे मुख्य प्रवर्तक व अँग्रो व्हिजनचे सल्लागार तसेच शेतकरी वर्ग उपस्थित होते.

या प्रसंगी अँग्रो व्हिजन या कार्यक्रमाला गडचिरोली वरून भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेश भुरसे उपस्थितीत होते.

Latest Posts

Don't Miss