Latest Posts

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना ईआर-१ मध्ये ३० नोव्हेंबर पर्यत सादर करावी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : या कार्यालयामार्फत सेवायोजना  क्षेत्र  माहिती  विभागाकडून सेवायोजन कार्यालय, रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे, कायदा १९५९ च्या कलम ५ (१) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय,तसेच कलम ५ (२) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यातर्गत असणाऱ्या आस्थापनाकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची  पुरुष व स्त्री असे एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहिनुसार ईआर-१ मध्ये विषयाकिंत कायद्यातील  तरतुदी  नुसारनियमितपणे  पाठविणे बंधनकारक आहे.

तसेच जुलै व संप्टेबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीची नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक सांख्यिकी महिती,सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय,निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनाकडून त्यांच्या आस्थापनेवर सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष व स्त्री एकूण अशी सांख्यिकी माहिती संकलनाचे काम या कार्यालयाद्वारे चालू आहे.

तरी यासाठी अशा आस्थापनाकडून १०० टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक असल्याने,सदरची माहिती सर्व संबंधितांनी ३०  नोव्हेंबर,२०२३ पर्यत या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने भरावी असे आवाहन या कार्यालयाचे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,भंडारा या विभागानी कळविले आहे.

तसेच यापूर्वी या कार्यालयाकडून युझरनेम व पासवर्ड देण्यात आलेले आहे.तरी सदरील तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ ही आहे.यांची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी, तसेच अहवाल विहित मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करुन, कायद्याचे अनुपालन करुन या विभागाला सहकार्य करावी, असे संबंधित विभागानी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss