Latest Posts

रबी हंगामातील पीक प्रात्यक्षिके व बियाणे वितरण कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान सन २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामात शेतक-यांचे उत्पनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने कृषि विभागा मार्फत पिक प्रात्याक्षिके, प्रमाणित बियाणे वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी हरभरा, जवस, करडई, मोहरी आणि तिळ या पिकांचे महाडीबीटी प्रणालीव्दारे शेतकऱ्यांकडून बियाण्यांच्या मागणीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, तर पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहेत.

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाणाचा दोन हेक्टर मर्यादेत लाभ दिला जाणार आहे. या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरीता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in/ केलेल्या अर्जातून ऑनलाईन पध्दतीन करण्यात येणार आहे, असे आव्हान संगीता माने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भंडारा यांनी केलेले आहे.

Latest Posts

Don't Miss