विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी इस्टेटचे ६ वे राजे तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्याने आज दानशूर चौक, अहेरी येथे संध्याकाळी ७ वा. राजे फाऊंडेशन, अहेरी तथा दानशूरचा राजा गणेश मंडळ, अहेरी तर्फे भव्य लाडुतुला कार्यक्रम आयोजित केला आहे.
अहेरी शहरातील विविध चौकात केक कापून राजेंचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरे केले जाणार आहे, तरी होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांना राजेंचा चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.