– युवा वर्गात राजेंची प्रचंड लोकप्रियता यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात सातत्याने होत आहेत भाजपा प्रवेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : अहेरी तालुक्यातील लगाम-बोरी क्षेत्रातील सिंगनपेठ, बोरी येथील अनेक युवकांनी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये नुकतेच प्रवेश केले, अहेरी येथिल रुक्मिणी महालात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी युवा कार्यकर्ते यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या सोबत बसून त्यांच्या क्षेत्रातील व गावातील समस्ये बाबत सविस्तर चर्चा केली, मी तुमच्या प्रत्त्येक समस्येचं निवारण करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहो अशी ग्वाही त्यांना दिली, आणि मी सदैव तुमच्या सोबत आहो असे म्हणत त्या युवकांचा आत्मविश्वास वाढवला. भाजपात मोठ्या प्रमाणावर युवकांचे इनकमिंग सुरूच आहे.
काही दिवसापासून मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहात युवा वर्ग माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली अहेरी विधानसभा क्षेत्रातील ५ ही तालुक्यातील गावा-गावातून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा शांत संयमी स्वभाव, आपल्या क्षेत्रातील विकासासाठी असलेली धडपड, विकासाची दूरदृष्टी, नवनवीन विकासात्मक धोरण हे आजच्या युवा पिढीला आकर्षनाचे केंद्र बिंदू ठरत आहे.
यावेळी सिंगनपेठ येथील अजय निखाडे, सचिन डोके, गणेश निखाडे, विक्की पुल्लीवार, हनुमंत निखाडे, रोहिदास डोके, कुंडल वाघमारे, गुरुदास डोके, विनोद वाघमारे, विशाल करमे, राजेश पसूला (सिरोंच्या) तसेच स्थानिक अहेरी येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.