Latest Posts

राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांच्या उपस्थितीत हजारो भाविकांचा आरडा येथे बोनालु महोत्सव संपन्न

– राजे अम्ब्रिशराव महाराजांनी श्री. मल्लिकार्जुन स्वामींचे बोनालु (नैवेद्य) सोबत घातली साखडे
– तीन राज्यातील हजारो भाविक घेतात मल्लीकार्जुन स्वामींचे दर्शन महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड राज्यातील भाविक सहभागी
– प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती नदीवरील पुलामुळे आवागमन वाढले पिवळ्या कलश आणि बँड बाजाने वेधले भाविकांचे लक्ष
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : सिरोंचा तालुका मुख्यालयापासुन पाच किमी अंतरावर असलेल्या आरडा गावातील मल्लीकार्जुन स्वामी मंदिर परिसरात २४ व २५ डिसेंबर रोजी शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या बोनालु (जत्रा) उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्य सिरोंचा तालुक्यातील व तेलंगणा राज्यातील दरवर्षी जवळपास ३० ते ४० हजार भाविकांच्या गर्दीने मल्लीकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून जात होता यंदाही भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आले. आरडा गावात असलेल्या मल्लीकार्जुन स्वामी मंदिरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात जत्रा भरते. यावर्षी सुध्दा जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्री. मल्लीकार्जुन स्वामी यांचे भक्तगण सिरोंचा तालुक्यासह तेलंगणा व छत्तीसगड राज्यात आहेत. उत्सवादरम्यान विविध प्रकारची दुकाने मोठ्या प्रमाणात लागले होते. भक्तगण मल्लीकार्जुन स्वामींचे दर्शन घेऊन पुजाअर्चना करन्यात आले. आपली मनोकामना पूर्ण व्हावी, यासाठी स्वामींना साकडे घालतात. बोनालु म्हणजे एका कलशात नैवेद्य खिर शिजविली जाते. शिजलेली खिर सजविलेल्या मडक्यात कलशात ठेवली जाते. नंतर ते मडके (कलश) डोक्यावर घेऊन महिला भाविक मंदिराच्या सभोवताल तीन प्रदक्षिणा घालतात.

गुंडामध्ये बनविलेली खीर मडक्यात शिजवून डोक्यावर ठेवून मंदीरासभोवताल वाजे गजरात माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली राजे अंब्रिशराव आत्राम यांचा सोबत मोठ्या भक्ती भावाने तीन प्रदक्षिणा करण्यात आहे. विशेष म्हणजे १५० वर्षापासून आरडा गावातील प्रतिष्ठित बापन्ना रंगुवार परिवार सर्व प्रथम मल्लिकार्जुन स्वामींचे नैवेद्य डोक्यावर उचलून बोनालु उत्सवाला प्रारंभ होतो.

त्यानंतर स्वामींना प्रसाद अर्पण करुन उपस्थित भाविकांनाही प्रसाद दिला जातो. मल्लीकार्जुन स्वामी जत्रा ही सिरोंचा तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा आहे. सदर जत्रा भाविक व नागरीकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. भाविकांच्या मनोरंजनासाठी रविवार रात्री २४ डिसेंबर ला आंध्रप्रदेशातील गुंटूर येथील कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जत्रेत रात्र भर लोकांची अलोट गर्दी असतो मनोरंजनाची आयोजन केले होते. जत्रा चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी आरडा गावातील माजी उपसरपंच बापन्नां रंगुवार यांच्या नेतृत्वाखाली उत्सव कमेटी अध्यक्ष मनोज रंगुवार, आरडा येथील नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष विशाल रंगुवार, सचिव सूरज रंगूवार, अशोक रंगु, तालापल्ली शंकर, राजेश रंगुवार, रंगु मुरली, संतोष पंतंगी, महेश बोरा व गावातील सर्वच नागरीकांनी सहकार्य केले. जत्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडु नये, यासाठी स्थानिक आपदा मित्र किरण वेमुला यांच्या पथकाने आपत्ती व्यवस्थापना मध्ये चोख बंदोबस्त करीता परिश्रम घेतले.

भाविकांनी लुटला मनमुराद आनंद –
२४ डिसेंबर रविवारी रात्री भाविकांच्या मनोरंजनासाठी आंध्रप्रदेश राज्यातील गुंटूर येथील डुप्लिकेट हिरो व हिरोहिन नटीच्या मनोरंजनाचा कार्यक्रमाची आयोजित केला होता. यावेळी तीन राज्यांचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिरोंचा जवळील प्राणहिता व गोदावरी आणि इंद्रावती या तीन्ही पुलाचा रहदारी सुरू असल्याने तेलंगणा येथील भूपालपल्ली व मंचेरीयल आणि या जिल्ह्यातील भाविकांची गर्दी दिसून आली तसेच इंद्रावती नदीवर पुलावरून रहदारी सुरू झाल्यांनी छत्तीसगड राज्यातील भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधुनिक युगातही आरडा येथील बोनालु यात्रा बघण्यासाठी तेलंगाना, छत्तीसगड सहित गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, मेडाराम, कारसपल्ली, रंगय्यापली, पोचमपल्ली, नगरम, जानमपल्ली, येथील भाविक बैलगाडीनेही बोनालु जत्रा बघण्यासाठी आले होते. दुचाकी चारचाकी मोठ्या प्रमानात दिसून आले यामुळे यात्रेत रस्त्यावर बैल गाडीची, दुचाकी व चारचाकी लाईन लागली होती.

यावर्षी भाविकांच्या संख्येत वाढ –
मागील दोन वर्ष कोराना मुळे भाविक संख्या कमी दिसून आली होती मात्र यावर्षी भाविकांची मोठ्या प्रमाणात अलोट गर्दी दिसून आली. सिरोंचा नजीकच्या गोदावरी व प्राणहिता पुलावरून तेलंगणा राज्यातील भाविकांची हजेरी तसेच इंद्रावती नदि पुलावरून छत्तीसगड राज्यातील भावीकांच्या संख्येत वाढ झाली आहे. २५ डिसेंबर ला गुंडामध्ये बनविलेली खीर मडक्यात शिजवून डोक्यावर ठेवून मंदीरासभोवताल वाजे बाजे सोबत मोठ्या भक्ती भावाने तीन प्रदक्षिणा करण्यात आहे.विशेष म्हणजे १५० वर्षापासून आरडा गावातील प्रतिष्ठित बापन्ना रंगुवार परिवार सर्व प्रथम मल्लिकार्जुन स्वामींचे नैवेद्य डोक्यावर उचलून बोनालु उत्सवाला प्रारंभ होतो.

Latest Posts

Don't Miss