– मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड वितरण.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : ग्रामपंचायत कार्यालय राजपूर पॅच यांच्या पटांगणात महास्वामित्व योजना अंतर्गत सनद/ पट्टा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.
उपअधीक्षक भूमी अभिलेख तहसिल कार्यालय अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा रामपुर व खमनचेरु या गावाचे दोन सर्वेक्षण करून रामपूर व खमनचेरू येथील लाभार्थ्यांना स्वतःच्या घराचे मालकी हक्क व स्वातंत्र मालमत्ता पत्रक तयार करून भविष्यात सदर मालमत्तेवर बँक कर्ज घेणे व मालमत्ता गहाण ठेवण्याचा अधिकार या प्रॉपर्टी कार्ड चे महत्व आहे. गेल्या अनेक वर्षापासून गावरान जमिनीवर नागरिकांनी वास्तव्य करत होते. पण त्याचा लाभार्थ्यांना कसलाही प्रकारचे लाभ मिळत नव्हते. मात्र या योजनेअंतर्गत धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात राजपुर, रामपुर, बोरी येथील कार्यकर्ते पाठपुरावा करुन प्रॉपर्टी कार्ड सनद मिळवुन दिला स्वमालकी हक्काची जमीन त्या जमिनीवर बँक कर्ज घेणे व जमीन गहाण ठेवणे याबाबतची लाभार्थ्यांना मोकळीक झालेली आहे.
यावेळी नामदार राजे धर्मराव बाबा आत्राम मंत्री अन्न व औषध प्रशासन आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते रामपूर येथील ६५ नागरिकांना तर खमनचेरू येथील २६ लाभार्थ्यांना सनद पट्टा यावेळी वाटप व बोरी येथिल ३ नागरीकांना वन हक्क पट्टयाचे सुद्धा वाटप करण्यात आले. यावेळी अहेरी चे तहसीलदार सय्यद, राजपूर ग्रामपंचायत च्या सरपंचा मीना वेलादी, उपसरपंच सविता कोकीवार, आंबेकर जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, अहेरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळबांधे साहेब, कांबळे साहेब उपअधीक्षक भूमी अभिलेख कुरखेडा, ऋतुराज हलगेकर, अरुण मुक्कावार लक्ष्मण येर्रावार सिनू विरगोनवार, महेश बाकीवार, विजय कोकीवार, नितीन गुंडावार, दर्रो सचिव ग्रा.पं. राजपुर पॅच, शेखर पुल्लीवार, रामा बद्दीवार, अशोक वासेकर, साईनाथ अलवलवार, चांदेकर, गाठले तलाठी हे यावेळी उपस्थित होते. तसेच अहेरी येथील महसूल विभागाचे व भूमि अभिलेख कार्यालय येथील क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी व रामपूर, खमनचेरू येथील असंख्य नागरिकांनी उपस्थिती दर्शवून या कार्यक्रम सहभागी झाले. प्रॉपर्टी कार्ड धारकांनी मंत्री महोदयाचे अभिनंदन केले.