Latest Posts

दुर्मिळ बॉम्बे रक्त आता सहज उपलब्ध होणार : ICMR बनवणार रक्तदात्यांची रजिस्ट्री

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : सामान्यत: रक्ताचे चार गट असतात. ए, बी, एबी, ओ पॉजिटिव्ह आणि निगेटिव्ह हे रक्तगट आपल्या सर्वांना माहिती आहेच. परंतु आणखी एक दुर्मिळ रक्तगट आहे आणि तो बॉम्बे या नावाने ओळखला जाता.

या रक्तगटाच्या लोकांची संख्या अतिशय दुर्मिळ आहे. त्यामुळे या रक्तगटात कुणाला रक्ताची गरज भासली तर ते मिळवणे कठीण असते. ही परिस्थिती लक्षात घेऊन आयसीएमआरने आता एक चांगला निर्णय घेतला आहे. बॉम्बे रक्तगट असलेल्या लोकांची आयसीएमआरकडून रजिस्ट्री बनवण्यात येणार आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत म्हणजेच आयसीएमआरकडून राष्ट्रीय दुर्मीळ रक्तगट रजिस्ट्री बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बॉम्बे रक्तगटाची व्यक्ती सहजरीत्या उपलब्ध होणे शक्य होणार आहे. बॉम्बे रक्तगट असलेल्या लोकांची माहिती गोळा करण्याचे काम भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनो हेमॅटॉलॉजी या संस्थेतर्फे सुरू करण्यात आले आहे.

रक्तगटाला बॉम्बे नाव कसे पडले?
बॉम्बे रक्त्तगटाचा शोध मुंबई शहरात लागला. त्यामुळे त्याला बॉम्बे याच नावाने संबोधले जाते. संपूर्ण जगभराचा विचार केला तरी हा रक्तगट असलेल्या लोकांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे या गटातील एकाद्या व्यक्तीला रक्ताची गरज भासली तर रक्तदात्याला एका देशातून दुसऱ्या देशात देखील जावे लागले. अनेकदा रक्त देण्यासाठी बॉम्बे रक्तगटाचे लोक एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन रक्तदान करतात. परंतु आता आयसीएमआरच्या या उपक्रमामुळे देशात बॉम्बे रक्त सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

रक्तगट अतिशय दुर्मिळ उपलब्धता कमी –
महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यभरात एकूण ३६३ रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी ७६ रक्तपेढ्या शासकीय आणि २८७ रक्तपेड्या या धर्मादाय आणि खासगी आहेत. परंतु बॉम्बे रक्तगट अतिशय दुर्मिळ असल्याने तो सहज उपलब्ध होत नाही. त्यासाठी आयसीएमआरने हाती घेतलेल्या या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. स्मिता फळ म्हणाल्या, २० वर्षापूर्वी मला माझ्या रक्तगटाची माहिती मिळाली होती. माझा रक्तगट देखील बॉम्बे आहे. आमचा बॉम्बे रक्तगट असलेल्या दात्याचा एक ग्रुप आहे. त्याठिकाणी कुणाला गरज लागली तर आम्ही एकमेकांना मदत करतो. परंतु रजिस्ट्री बनविण्याचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे.

Latest Posts

Don't Miss