Latest Posts

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठात विकसित भारत युथ पार्लमेन्टचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार नेहरु युवा केंद्र  मेरा युवा भारत, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे विकसित भारत युथ्‍ पार्लमेन्ट २०२५ चे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ९ मार्च पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा यांनी केले आहे.

विकसित भारत युथ्‍ पार्लमेन्ट २०२५ चे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील युवक सहभागी होऊ शकतात. यासाठी युवांचे वय १८ ते २५ दरम्यान असावे. स्पर्धेत युवक व युवतींना दिलेल्या विषयावर स्वत:चा एक मिनिटांचा व्हिडिओ तयार करुन युवा भारत पोर्टल वर mybharat.gov.in या संकेत स्थळवर अपलोड करावा लागेल. अपलोड केलेल्या व्हिडिओची समिती मार्फत तपासणी करुन  जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभागासाठी संधी देण्यात येईल. अधिक माहितीसाठी mybharat.gov.in या संकेत स्थळाला भेट दयावी असे नेहरु युवा केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss