Latest Posts

रेशन दुकानावर आता मिळणार मोफत साडी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : रेशन दुकानावर अन्नधान्यांबरोबरच आता साडीही मिळणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. ठराविक सण-उत्सवानिमित्त साडीचे वाटप केले जाणार आहे.

वर्षाला मिळणार एक मोफत साडी –
चैत्र पाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळीनिमित्त रेशन दुकानातून आनंदाचा शिधा दिला जातो. तसेच निश्चित केलेल्या सणाच्यावेळी दरवर्षी एक साडी लाभार्थिंना दिली जाणार आहे.

अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ –
राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंत्योदय कार्डधारकांना त्याचा लाभ होणार आहे.

Latest Posts

Don't Miss