Latest Posts

नोंदणीकृत पत्रकारांनी १३ ते १६ जून पर्यत आवेदन स्विकारण्यात येतील : उपसंचालक साकोली विभागाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : भंडारा- गोंदिया जिल्ह्याच्या अंतर्गत असलेल्या नोदणीकृत पत्रकारासाठी वन व वन्यजीव विषयक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्याचे करण्यात आले असून १८ जून २०२४ भंडारा जिल्हातील पत्रकारांसाठी व १९ जून २०२४ रोजी गोंदिया जिल्हयातील पत्रकारांचे दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने वन व वन्यजीव विषयक अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी होण्याकरीता इच्छुक पत्रकारांनी १३ जून २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून ते १६ जून, २०२४ सायंकाळी ८.०० वाजेपर्यंत भंडारा व गोंदिया जिल्हयातील पत्रकारांकडून आवेदन स्विकारण्यात येतील. त्याकरीता प्रशासनाच्या सोईकरीता ऑनलाईन रजिष्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. त्याकरीता सदर आवेदन फार्म ऑनलाईन पध्दतीने रजिष्ट्रेशन करण्याकरीता सोबत QR कोड उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

त्यासाठी वन व वन्यजीव विषयक अभ्यास दौरा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या भंडारा- गोंदिया जिल्हयातील सर्व इच्छुक पत्रकारांनी याची नोंद घ्यावी. विशेष माहिती करीता www.nawegsonnazira.com या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहन उपसंचालक नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली या विभागानी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss