Latest Posts

दुर्गम भागाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केवळ आणि केवळ भाजपाच करू शकते : राजे अम्ब्रीशराव आत्राम 

– पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी अशोक नेते याना प्रचंड बहुमताने विजयी करा
– एटापल्ली तालुक्यातील गुंडाम येथे प्रचार सभा संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : एटापल्ली तालुक्यातील राज्याच्या शेवटच्या टोकाचे गाव गुंडाम येथे मोठ्या संख्येने ऊपस्थिती असलेल्या प्रचारसभेत बोलतांना राजे यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे लोटूनही आपल्या भागात शेकडो गावात विज पोहोचली नव्हती. रस्ते व पुलांच्या अभावामुळे जनतेला अतिशय कठीण परिस्थीतीत जगावे लागत होते. आज गुंडाम सारख्या अत्यंत दुर्गम भागापर्यंत पर्यंत रस्ते व विज पोहोचलेली आहे. यावेळी मंचावर प्रशांत आत्राम, प्रशांत कुत्तरमारे, रवी नेलकुद्री, मोहन नामेवार, दामोदर नरोटे, सुनील मडावी, बंडु इष्टाम, योगेश कुमरे, राजू लेनगुरे, शुभ मुरलीवार, सम्मा जेट्टी, दीपक पांडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना पुर्वी छोट्या छोट्या वस्तुंसाठी थेट तालुक्याला जावे लागायचे परंतु आज रस्ते बनल्यामुळे खेडोपाडी आठवडी बाजार भरत आहे. शासनच नव्हे तर जग सुध्दा तुमच्या दारात येवुन पोहोचलेले आहे. याचे श्रेय केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारला जाते. दुर्गम भागातील आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्याचे काम फक्त भाजपानेच केले आहे, असे प्रतिपादन केले. राजे यांच्या आगमनासाठी शेकडोच्या संख्येने नागरीक ऊत्सुकतेने ऊपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss