Latest Posts

महसूल सप्ताहानिमित्य धानोरा येथे खासदार अशोक नेते यांनी घेतला आढावा

– योजनांच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / धानोरा (Dhanora) : भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खा. अशोक नेते यांनी मंगळवार ३ रोजी धानोरा येथील तहसील कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

यावेळी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. कोणीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्या, अशी सूचना त्यांनी केली.

महसूल सप्ताहानिमित्य घेतलेल्या या आढावा बैठकीताल माजी जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ नेते साईनाथ साळवे, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस रेखा डोळस, धानोराच्या तहसीलदार आम्रपाली लोखंडे, बिडीओ टिचकुले, कृ.उ.बा.स. सभापती तथा माजी तालुका अध्यक्ष शशिकांत साळवे, भाजपा तालुकाध्यक्षा लता पुनघाटे, माजी पं.स. उपसभापती अनुसया कोरेटी यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss