Latest Posts

ग्रामीण रूग्णालय आष्टी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी (Ashti): २१ जून २०२४ शुक्रवार ला ग्रामीण रूग्णालय आष्टी ता. चामॉर्शी जिल्हा गडचिरोली येथे रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांनी योगासने करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणजे योगाच्या फायद्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि जगभरात त्याच्या सरावाचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी २१ जून ला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. २०१४ मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने औपचारिकपणे त्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्दिष्ट जगभरात योगाभ्यासाच्या अनेक फायद्यांबद्दल जागरुकता वाढवणे आहे . आंतरराष्ट्रीय योग दिनाची स्थापना करणारा मसुदा ठराव भारताने प्रस्तावित केला होता आणि त्याला विक्रमी १७५ सदस्य राष्ट्रांनी मान्यता दिली होती.

आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रत्येक २१ जून ला साजरा केला जातो. त्याची ओळख आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. मानसिक आरोग्य फिटनेस, मन, शरीर आणि आत्म्याचे शारीरिक आरोग्य फिटनेस प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हे आपल्या शरीराला टवटवीत बनवते आणि आपल्याला शांत ठेवते. योगाचे फायदे सांगण्यात आले तसेच नियमित योगा करणे. अशा प्रकारे योग दीन साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. ऋषिकेश बर्डे, डॉ. प्रशांत दाखडे, डॉ. दामोदर, डॉ. तुरकर मॅडम, डॉ. देवतळे, हेमंत कुळमेथे, मनोज बघमारे, रुपाली राठोड, प्राजक्ता भेंडे, खोब्रागडे मॅडम, आकाश बंडावार, मनीष कस्तुरे, आशा सोनवणे, शुभम खोब्रागडे, उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss