Latest Posts

जिल्ह्याचे प्रसिद्ध युवा व्याख्याते साहिल रामटेके यांच्या प्रयत्नातून पर्यावरण वाचवा देश वाचवा ही मोहीम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / देसाईगंज (desaiganj) : जगात वाढत असलेल्या तापमानाला आळा घालण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील तुळशी या गावातील युवक पुढे सरसावले असून ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला. कोरोना सारख्या अति भयंकर काळामध्ये भारतातीलच नाही तर जगातील लोकांना वृक्षांचे महत्त्व समजले मात्र तरीसुद्धा माणसांची वृक्षां प्रती कुतूहलाची भावना जागृत झालेली नाही आणि त्यामुळे आज आपल्या देशात ५५° इतक्या भयंकर तापमानाची नोंद होत आहे.

आणि म्हणून अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची अत्यंत आवश्यकता असून या अंतर्गत तुळशी इथे पर्यावरण वाचवा देश वाचवा ही मोहीम गडचिरोली जिल्ह्याचे सुप्रसिद्ध युवा व्याख्याते साहिल रामटेके यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली ज्यामध्ये गावातील तरुणांनी सुद्धा आपले योगदान दिले.

ज्यामध्ये रोहित रामटेके, आदित्य रामटेके, कुणाल दूनेदार, पवन मारबते, पियांशू रामटेके, जयद नागरे, मयंक बारसागडे, तथागत नागरे, अनिकेत कोल्हे अशा मुलांचा समावेश होता. या पर्यावरणाचे समतोल टिकून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आणि त्यांचे संवर्धन करून पर्यावरणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे आव्हान पर्यावरण प्रेमी साहिल रामटेके यांनी केले आहे. या उपक्रमाबद्दल तालुकास्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss