Latest Posts

एसबीआय ग्राहकांना फटका : १ नोव्हेंबरपासून क्रेडिट कार्डच्या नियमात होणार बदल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे क्रेडिट कार्ड आहे. क्रेडिट कार्डच्या जमान्यात जगताना अनेकांना कोणत्याही ठिकाणाहून विविध गोष्टींचे बिल आणि पेमेंट्स करणे सोपे होते. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना वेगवेगळे फायदे देखील अनुभवता येतात.

सुद्धा क्रेडिट कार्डचा वापर विविध बिले, पेमेंट्स, गॅस बिल, पाणीबिल आणि लाईट बिलियन सारखी अनेकबिले भरत असाल तर, सावधान. भारत देशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच SBI BANK एसबीआय बँकने क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना एक मोठा झटका दिला आहे. ज्यामध्ये एसबीआय कार्डकडून क्रेडिट कार्डमध्ये काही नियमांचे बदल केले आहेत. हे नवीन नियम पुढील महिन्याच्या १ तारखेपासून म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून लागू करण्यात येणार आहेत.

बदललेले नियम –
एसबीआय बँकेने क्रेडिट कार्डमधून होणाऱ्या युटिलिटी बिल आणि पेमेंटवर १% एक्स्ट्रा चार्जेस लावण्याचा विचार केला आहे. एसबीआयच्या आधीच काही कंपन्यांनी एका मर्यादेनंतर युटिलिटी बिल पेमेंटवर एक टक्के एक्स्ट्रा चार्जेस घेणे सुरू केले आहे.

५० हजारांच्या युटिलिटी बिल पेमेंटवर बँक करणार एक्सट्रा चार्जची वसुली –
एसबीआयच्या क्रेडिट कार्डमधील स्टेटमेंट सायकलमध्ये ५० हजारांहून जास्त युटिलिटी बिल पेमेंटवर १% ने जास्त चार्ज घेण्यात येतात. दरम्यान पन्नास हजारांपेक्षा कमी युटिलिटी बिल पेमेंटवर कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्ज घेण्यात येत नाहीत.

फायनान्स चार्जेसमध्ये देखील केलाय बदल –
एसबीआयने डिफेन्स क्रेडिट कार्ड आणि शौर्य यांना सोडून इतर सर्व असुरक्षित क्रेडिट कार्डमधील फायनान्स चार्जेसमध्ये बदल केला आहे. १ नोव्हेंबरपासून एसबीआयच्या असुरक्षित क्रेडिट कार्डवर ३.७५% फायनान्स चार्जेस लागू होतील. सुरक्षित क्रेडिट कार्ड एफडीच्या बदल्यात दिले जातात. त्याचबरोबर असुरक्षित क्रेडिट कार्डवर सिक्युरिटी डिपॉझिट किंवा कॉलेटरल द्यावे नाही लागत.

Latest Posts

Don't Miss