Latest Posts

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरीता जेईई आणि नीट प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

– नागपूर शहरात दोनशे जागांकरिता प्रशिक्षण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बार्टीमार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी JEE-१०० व NEET-१०० जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी विद्यार्थी अकरावी(विज्ञान) शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याजवळ महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा व अधिवास दाखला असावा. कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या घरात असावे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करावी.

जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी नमुद केल्याप्रमाणे महिला ३०%, दिव्यांग (PWD) ५%, अनाथ १%, वंचित ५% जागा आरक्षित असतील. प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता निहाय उमेदवारांची निवड करण्यात येईल.

प्रशिक्षणाचा कालावधी २४ महिन्यांचा असणार आहे. प्रशिक्षण काळात ७५% पेक्षा जास्त उपस्थिती राहिल्यास विद्यार्थ्यांना दरमहा ६ हजार रु. प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरीता अधिकाधिक विद्यार्थ्यांनी https://jee-neet.barti.co.in/public/ या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन महासंचालक बार्टी मार्फत करण्यात आले आहे.

 

Latest Posts

Don't Miss