Latest Posts

गडचिरोली पोलीस दलातर्फे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

– सायबर क्राईम, अंमली पदार्थ सेवन व त्याचे होणारे दुष्परिणाम, महिला व बालकांचे अधिकार या विषयांवर पोलीसांनी केली विद्याथ्र्यांमध्ये जागृती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : सध्या संपुर्ण भारतात नशा मुक्त भारत हा शासनाचा मोठा उपक्रम सुरु असून, त्यामध्ये सन २०४७ पर्यंत संपुर्ण भारत नशा मुक्त करण्याचे प्रयोजन असल्याने शासनाच्या विविध विभागांमार्फत उपक्रम राबविण्यात येत आहेत.

पोलीस अधिक्षक, गडचिरोली निलोत्पल यांनी सदर योजनेत पोलीसांची भुमिका महत्वाची असल्याने व देशात अंमली पदार्थाच्या सेवनाच्या प्रकारास प्रतिबंध करावयाचा असल्यास मुख्यत: शालेय विद्याथ्र्यांना अंमली पदार्थाच्या सेवनापासून परावृत्त केल्यास भविष्यात नशा मुक्त भारत होण्यास वेळ लागणार नाही हे जाणून गडचिरोली शहरातील सर्व शाळातील किशोरवयीन विद्यार्थ्यांना एकत्रीत करून त्यांना मार्गदर्शन करण्याचा निर्धार करून स्थानिक गुन्हे शाखा, भरोसा सेल व सायबर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदारांना निर्देश दिले.

आज १४ ऑक्टोबर २०२३ रोजी गडचिरोली शहरातील माऊंट कारमेल या शाळेच्या सभागृहात मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत राणी दुर्गावती विद्यालय, वसंत विद्यालय, कारमेल विद्यालय, व्हियानी विद्यानिकेतन, गोंडवाना सैनिक स्कूल, शिवाजी हायस्कूल गोकुळनगर, विद्याभारती कन्या शाळा, जिल्हा परिषद हायस्कूल, शिवकृपा ज्युनिअर कॉलेज, भगवंतराव हिंदी हायस्कूल, संत गाडगे महाराज हायस्कूल या शाळांमधील अंदाजे ७००-८०० विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी सहभाग घेतला.

सदर कार्यशाळेमध्ये तीन प्रमुख विषयांवर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यात अंमली पदार्थाचे सेवनाने वैयक्तीक, सामाजिक व कौटुंबिक होत असलेल्या परिणामांबाबत माहीती देवून अंमली पदार्थाच्या सेवनापासून विद्याथ्र्यांनी लांब राहावे. तसेच त्यांचे आजुबाजुचे परिसरात कोणी अंमली पदार्थाचा पुरवठा करीत असल्यास ती माहीती तात्काळ त्यांचे शिक्षक अथवा पोलीस विभागाकडून पुरविण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकांवर देण्याबाबत आवाहन करण्यात आले.

सध्या देशात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने वेळीच सोशल मिडीया व तांत्रीक संसाधने वापरतांना काय खबरदारी घ्यावी याबाबत सायबर सुरक्षा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सध्या भारतात अत्युच्च पदांवर महिला कार्यरत असतांना देखील समाजात महिला व बालकांवर होणारे अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत असल्याने महिला व बालक यांना अत्याचारांपासून मिळणारे कायदेशिर संरक्षण याबाबत सविस्तर माहीती देण्यात आली. वरील विषय विद्याथ्र्यांना सहज आकलन होण्याकरीता जनहितार्थ प्रसारीत झालेल्या लघुपट देखील विद्याथ्र्यांना दाखविण्यात आले.

सदर कार्यक्रमास पोलीस अधीक्षक, गडचिरोली निलोत्पल अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली मयुर भुजबळ, शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी प्रामुख्याने मोलाचे मार्गदर्शन केले असून, अंमली पदार्थ सेवनामूळे होणा­या दुष्परिणामांबाबत पोलीस निरीक्षक, उल्हास भुसारी, महिला व बालकांच्या अधिकारांबाबत मसपोनि रुपाली पाटील व सायबर सुरक्षा या विषयावर पोउपनि. निलेशकुमार वाघ यांनी विद्याथ्र्यांना माहीती दिली. सदर कार्यक्रमास गडचिरोली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अरुण फेगडे हे देखील उपस्थीत होते.

सदर कार्यक्रमास शिक्षणाधिकारी राजकुमार निकम तसेच माऊंट कारमेल शाळेचे उपप्राचार्य सिस्टर नॅन्सी व त्यांच्या सहका­यांनी विशेष परिश्रम घेवून सर्व गडचिरोली शहरातील शाळांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात एकत्रित केले.  सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती शुभांगी मेश्राम, कारमेल हायस्कूल, गडचिरोली यांनी केले तर आभार प्रदर्शन साखरे, कारमेल हायस्कूल यांनी केले.

– सशक्त युवक अथवा विद्यार्थी हा सशक्त भारताचा पाया असल्याने विद्यार्थी दशेत चुकीच्या आमिषांना बळी न पडता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास आपले जीवन समृद्ध करता येईल. उपस्थीत कार्यशाळेतील प्रत्येक विद्याथ्र्याने त्याचे शाळेत, घरी किंवा आजुबाजुच्या परिसरात आजच्या कार्यशाळेबाबत किमान १० लोकांना माहीती दिल्यास व त्या १० लोकांनी पुढे प्रत्येकी १० लोकांना माहीती दिल्यास मोठ्या प्रमाणात जनजागृती होवून अंमली पदार्थ, सायबर गुन्हेगारी व महिला आणि बालकांसंदर्भातील गुन्ह्रांना प्रतिबंध होणेस मदत होईल.
(निलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली)

– आजचा विद्यार्थी पुर्वीच्या काळापेक्षा अधिक तंत्रज्ञानाने प्रगत झाला आहे. पुर्वी नोकरीची सुरुवात होईपावेतो मोबाईल किंवा अन्य संसाधने विद्यार्थ्यांना मिळणे दुरापास्त होते. परंतु आज इयत्ता ९ वी १० वी पासून विद्यार्थी मोबाईल किंवा अन्य संसाधने हाताळत आहेत. मोबाईल हे दुधारी शस्त्र असून त्याचा वापर अचुक पद्धतीने केल्यास प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. परंतु चुकीच्या पद्धतीने विद्याथ्र्यांनी मोबाईलचा वापर केल्यास आयुष्य उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही.
(कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक,गडचिरोली)

– पोलीस दलातर्फे राबविण्यात येत असलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून आज जिल्ह्राच्या ठिकाणी होत असलेला कार्यक्रम भविष्यात तालुका, गावपातळीवर पोहचवून गडचिरोली जिल्ह्रातील सर्व शाळांमध्ये या विषयांवर जनजागृती झाल्यास विद्याथ्र्यांमध्ये जागृती निर्माण होणार असल्याने असा मार्गदर्शनपर कार्यक्रम शाळांमध्ये आयोजित करण्याकरीता शिक्षण विभागाकडून पोलीस विभागास मनापासून सहकार्य असेल.
(राजकुमार निकम, शिक्षणाधिकारी, गडचिरोली)

Latest Posts

Don't Miss