Latest Posts

शाळेतील विद्यार्थ्यांना शुध्द पाणी मिळावे या दृष्टीकोनातुन जिल्हा परिषदेच्या शाळांना आरओ वॉटर फिल्टर : खासदार रामदास तडस

– प्राथमिक शाळा रत्नापुर, हुस्नापुर, रोहणी, सावंगी (यें), विजयगोपाल, एकांबा, पिपरी, लोणी, पळसगाव, मुरदगाव (खोसे) मध्ये वॉटर फिल्टरचा लोकार्पन सोहळा संपन्न.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे, त्यांना शाळेत सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विहीर किंवा नळाव्दारे उपलब्ध होत होते, शाळेतील विद्यार्थ्यांना शुध्द पाणी मिळावे या दृष्टीकोनातुन खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांना आरओ वॉटर फिल्टर उपलब्ध करुन दिलेले आहे. असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त केले. ते विविध विकास कामांच्या लोकार्पन प्रंसगी बोलत होते.

प्राथमिक शाळा रत्नापुर, हुस्नापुर, रोहणी, सावंगी(यें), विजयगोपाल, एकांबा, पिपरी, लोणी, पळसगाव, मुरदगाव (खोसे) मध्ये खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत् वॉटर फिल्टरचा लोकार्पन सोहळा खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी भाजपा देवळी तालुका अध्यक्ष राजु रोकडे, जिल्हा सचिव दशरथ भुजाडे प्रविण काटकर, निलेश तिजारे, प्रमोद चव्हाण उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाला प्राथमिक शाळा रत्नापुर येथे सरपंच सुधीर बोबडे, उपसरपंच सौरव कडू, सचिव वर्षा खंडेराव, ग्रा.पं. सदस्य देवीदास वाघ, ग्रा.पं सदस्य अयुब अली, ग्रा.पं सदस्या सुनीता सडमाके, शिक्षक श्रीराम सहारे, सुनील खडसे, सागर कडु, चेतन फलके, खुशाल शेंदरे, पुरुषोत्तम नेहारे, प्राथमिक शाळा हुस्नापुर येथे ग्रा.प. सदस्य छाया ताजने, हेमंत काळे, मुख्याध्यापक हिवंज, मिलींद ताजने, ग्रामसेवक चौधरी, गौरव ताजने, प्राथमिक शाळा रोहणी येथे सरपंच अजय खडसे, माजी प.स. सदस्य स्वप्नील खडसे, ग्रामसेवक शेंडे, मुख्याध्यापक लिचडे, संजय शहाडे, प्राथमिक शाळा विजयगोपाल सरपंच चंदा गुल्हाने, उपसरपंच आशा किमेकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण रेंगाळे, सचिन हाडके, ग्रामसेवक वरठी, मोहन पोहेकर, विरेन्द्र देशपांडे मुख्याध्यापक मोरे, प्राथमिक शाळा सावंगी येंडे मुख्याध्यापक अरुण हिवरे, ग्रामसेवक सारीका कोंडलवार, रुपेश अडेकर, राजु कांबळे, लता बोरकर, दशरथ पन्नासे, किशोर येंडे, प्राथमिक शाळा एकांबा सरपंच मंगेश आत्राम, उपसरपंच रंजना सुटे, ग्रामसेवक कमलेश जाधव, पोलीस पाटील हेमराज सिडाम, मुख्याध्यापक बनसोड, राजु शिंदे, पळसगांव येथे सरपंच रितेश कांबळे, उपसरपंच सुचिता शेंडे, ग्रामसेवक राम डाखोरे, निलेश सोडकर, वर्षा कापसे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सरोदे, प्राथमिक शाळा मुरदगांव खोसे येथे सरपंच विलास सुसरे, उपसरपंच गजानन हिवरकर, ग्रामसेवक तृप्ती गावंडे, ग्रा सदस्य हरिश ओझा, मुख्याध्यापक खोडे, शुभांगी खडसे, शितल ओंकार, प्राथमिक शाळा लोणी येथे सरपंच वैभव श्यामकुवर, उपसरपं माया तिरळे, यशोधरा मेंढे, मुख्याध्यापक बहादुरे, चौधरी, प्रभाकर तिरळे रमेश मेंडे व मोठया संख्ये विद्याथी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss