विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : युवक कल्याण व क्रिडा विभागांनी १८ ते २ ऑक्टोंबर या दरम्यान युवांच्या सहभागाने विविध उपक्रमाचे आयोजन करणे, सेवाकार्य स्वच्छता हा नवीन संकल्प, स्वच्छता पंधरवाडा असे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी १५ ते २९ वयोगटातील युवांची माय भारत पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेश्राम यांनी केले आहे.
युवांना राष्ट्र निर्माण कार्यात सहभाग वाढविणे, विकासित भारत करण्यामध्ये युवांनी योगदान देणे या बाबत पोर्टलवर युवकांची नोंदणी करणे आवश्यक आहे. शाळा व महाविद्यालय, तसेच राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट गाईड, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांनी https://mybharat.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करावी. या नोंदणीमुळे युवांनी केलेल्या विविध कार्याची माहिती संकलित होते. त्यांनी विविध वर्षामध्ये तसेच कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्याबाबतचा तपशिल एकत्रित होतो यामुळे युवानी केलेले कार्याची वैयक्ति माहिती संकेत स्थळावर उपलब्ध होते. असे जिल्हा क्रिडा कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.