Latest Posts

कॉलरीच्या उपक्षेत्र व्यवस्थापक कार्यालय सील : थकबाकीदार मालमत्तांवर नगरपरिषदेची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : थकबाकीदार मालमत्ता धारकांविरोधात नगर परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. थकबाकीदार मालमत्ताधारक व दुकानमालकांवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. वेकोलिच्या उपक्षेत्र व्यवस्थापकाचे कार्यालय शुक्रवार २२ मार्च रोजी सील केल्याने खळबळ उडाली आहे.

बल्लारपूर अंतर्गत अनेक मालमत्ताधारक व दुकानदारांनी वारंवार नोटिसा व डिमांड नोटीस देऊनही मालमत्ता कर भरलेला नाही. २२ मार्च रोजी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशावरून काही थकबाकी धारकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती.  मालमत्ता कराच्या थकबाकीमुळे शुक्रवारी वेकोलि येथील उपक्षेत्र व्यवस्थापक कार्यालयाला सील ठोकण्यात आले. त्यांच्यवर ५३ लाख  ८७ हजार ९४६ रुपयांची थकबाकी होती. त्यानंतर डॉ.नितीन कल्लूरवार यांच्या मालमत्ते मधील मुथूट फायनान्स आणि आयएसएएफ फायनान्सच्या मालमत्तांना सील ठोकण्यात आले.

मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या निर्देशानुसार उपमुख्याधिकारी जयवंत काटकर, किशोर डाखोरे, आकाश मुन, राजेंद्र बारहाते, फुलसिंग गहेरवार, अशोक कोडापे,चापले तसेच अतिक्रमण पथक चे अनिल डांगोरे  व त्यांचे सहकारी व नगरपालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.उर्वरित मालमत्ताधारक व दुकानदार यांच्यावर जप्ती व सीलबंद करण्याची कारवाई २६ मार्च रोजी करण्यात येणार आहे. ३१ मार्च रोजीही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी सांगितले. बल्लारपूर शहरातील सर्व मिळकत मालक व दुकानदारांनी लवकरात लवकर मालमत्ता कर व भाडे थकबाकी न.प.कडे भरावी.  कार्यालयात पैसे जमा करून जप्तीची कारवाई टाळावी व पालिकेला सहकार्य करावे, अशी विनंतीही मुख्याधिकारी व प्रशासकांनी केली आहे.

Latest Posts

Don't Miss