Latest Posts

दुबई आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या लच्चा वेलादी या धावपटूचे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी सत्कार करून केली आर्थिक मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : दुबई आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या लच्चा वेलादी या धावपट्टुचा रुक्मिणी महल अहेरी येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, तसेच पुढील उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या सोबतच दुबई येण्या जाण्यासाठी मदत व्हावी ह्यासाठी आर्थिक मदतही केली.

अहेरी तालुक्यातील किष्ठापूर दोडगेर ह्या दुर्गम नक्षलग्रस्त भागातील राष्ट्रीय धावपट्टु लच्चा दुग्गा वेलादी राष्ट्रीय विजेत्या धावपट्टुने २८, २९ व ३० जुलै २०२३ दरम्यान पानीपत हरीयाणा दिल्ली येथे ईडीयंन ऑलम्पिक कमीटीचे ऊपाध्यक्ष तथा अरुणाचल प्रदेशचे आल्म्पीक कमीटी अध्यक्ष व माझी केन्द्रीय क्रीडा मंत्री पिडो रिच्यो तसेच संदीप भल्ला सचिव तथा डायरेक्टर, स्पोर्ट एचओडी अरुणाचल झिरो युनीवरसीटी याच्या आयोजन व प्रमुख ऊपस्थीतीत नॅशनल स्पोर्टस अँन्ड फिजीकल फिटनेस बोर्ड व्दारा झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पावसाच्या सार्वत्रीक सुरु असलेल्या थैमान बघता १८ ते २० राज्यातुन ५००च्या वर खेळाडु उपस्थित होते. त्यात अँथलेटीक्स प्रकारात ४०० मिटर मध्ये महाराष्ट्र विदर्भ चम्मु कडुन लच्चा वेलादी ने प्रथम स्थान सुवर्ण पदक प्राप्त केले. त्यांनी हा ०.५० मिनीटात पुर्ण केले आणि ईटंरनॅशनल स्पोर्टस अँन्ड फिजीकल फिटनेस बोर्ड स्पोर्टस गवरमेन्टं आँफ दुबई ( यु.ए.ई ) द्वारा आयोजीत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धे करीता त्याची निवड झाली. हि स्पर्धा ०६,०७,०८ व ०९ ऑक्टोबर २०२३ ला दुबई येथे होणार असुन भारतीय क्रीडा चम्मु दिल्ली विमानतळावरुन दुबई ( यु.ए.ई) करीता ५ आक्टोबंर २०२३ ला रवाना होणार आहे.

लच्चा दुग्गा वेलादी हा अहेरी तालुक्यातील अतीशय दुर्गम भाग दोडगीर या खेड्या गावचा रहीवासी आहे. त्याची घरची परीस्थीती अतिशय गरीब आहे, अश्या परीस्थीतीत देखील त्याने सबडपणा ठेवृन आजपर्यत अतिशय मेहनत घेतली प्रथम शासनाच्या आयोजीत आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक व २०२१ मध्येही त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत सिलव्हर मेडल मिळविले. त्याचे प्रशिक्षक जागतीक मास्टर्स कराटे सुवर्ण पदक विजेता थायलंड बँकाँक- २२ ,व जागतीक क्रीडा पुरस्कार प्राप्त तथा ब्रँन्ड अँम्बेसिटर, महाराष्ट्र प्रमुख आतंरराष्ट्रीय कोच तथा क्रीडामार्गदर्शक ए.आ.वि.प्र.अहेरी, तसेच आतंर विद्यापिठ स्पर्धा बॅडमिटंन व धावपट्टु विजेते तथा राष्ट्रीय कोच कब्बड्डी, खो-खो,अँथलेटीक, बॅटमिटंन व व्हालीबाॅल प्रा.सेन्साई रवि भांदककार याच्यां मार्गदर्शनात अहेरी येथे सराव करुन ही पातळी गाठली. या आतंरराष्ट्रीय स्पर्धेत आँफीशियल म्हणुन त्यांची देखील निवड झाली असुन सेन्साई रवि भांदककार हे देखील भारतीय चम्मु सोबत लच्चा वेलादीचे प्रशिक्षक म्हणुन सहभागी राहणार आहे.

Latest Posts

Don't Miss