Latest Posts

गंभीर दुखावत करणाऱ्या आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी (Ashti) : १३ जून २०१९ ला खुशाल शामराव राऊत (२४) यांचे काकाचा मुलगा विलास राऊत हा कामानिमित्य आरोपी कुसन भिवा लांबाडे यांचा रोजंदारीचा माणूस बंडू झाडे यास सोबत घेऊन चामोर्शी येथे गेले त्यामुळे आरोपी घरी येऊन खुशाल राऊत याला मजुरीचे माणसाला चामोर्शी येथे का नेले म्हणून शिवीगाळ करून उभारीने डोक्यावरती मारून गंभीर दुखापत केली. डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याने जखमी खुशाल राऊत यांच्या फिर्यादीवरून भा.द.वि.चे कलम ३२६, ५०४ अन्वये अपराध क्रमांक. ७०/२०१९ अन्वये गुन्हा नोंद करून तपासअंति दोषारोप पत्र न्यायप्रविष्ट करण्यात आले.

आरोपी विरुद्ध केस सिद्ध करण्याकरिता सरकारी पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सरकारी पक्ष व बचाव पक्षाचा सखोल युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला भा.द.वी.चे कलम ३२६ मध्ये ०१ वर्षाचा कठोर कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ०२ महिन्याची शिक्षा. व भा.द.वी.चे कलम ५०४ मध्ये ०३ महिन्याचा कठोर कारावास व २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ०१ महिन्याची शिक्षा. तसेच फिर्यादी खुशाल राऊत याला नुकसान भरपाई म्हणून ७ हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले.

सदर प्रकरणाची कामगिरी पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक चिंता गडचिरोली, अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश अहेरी, उपविभागीय पोलीस अधिकार अजय कोकाटे अहेरी, सहा. सरकारी अभियोग्यता एस.एम. सलामे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल प्र. काळे यांच्या नेतृत्वाखाली केस तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय गोंगले, कोर्ट पैरवी पोलीस शिपाई रामकिसन पवार यांनी सदरची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.

Latest Posts

Don't Miss