Latest Posts

जिल्हा बार असोसिएशन गडचिरोली तर्फे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांना निरोप

– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांचे नंदुरबार येथे स्तानांतरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांचे नंदुरबार येथे नुकतेच स्तानांतरण झाले असून त्यानिमित्य गडचिरोली जिल्हा बार असोसिएशन गडचिरोली तर्फे आज बार रूम क्र. ११४ मध्ये निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र दोनाडकर होते. सर्वप्रथम जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र दोनाडकर यांनी सत्कारमूर्ती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केले व त्यांना पुढील वाटचालीकरता जिल्हा बार असोसिएशन गडचिरोली तर्फे शुभेच्छा दिले.  त्यांनतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल आपले मनोगत व आपले गडचिरोली जिल्ह्यातील अनुभव व्यक्त करीत गडचिरोली जिल्ह्यातील वकील हे सर्वात संयमी आणि हुशार असल्याचे म्हंटले.

यावेळी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गडचिरोली मुधोळकर, मुख्य न्यायदंडाधिकारी गडचिरोली सदाफळे, न्यायदंडाधिकारी (प्र. श्रेणी) गडचिरोली श्रीमती सोरते, व्यायदंडाधिकारी (प्र. श्रेणी) गडचिरोली श्रीमती पठाण व जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी व अधिवक्तागण उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss