Latest Posts

शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचा पुण्यस्मरण दिनानिमित्य माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी वाहिली श्रद्धांजली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : १८५७ चा स्वातंत्र संग्रामातील महानायक, शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचा पुण्यस्मरण दिनानिमित्य जय पेरसापेन गोंड समाज, अहेरी तर्फे शहीद विर बाबुराव चौक, अहेरी येथे काल आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी वीर बाबुराव शेडमाके यांचा प्रतिमेचे तथा सल्ला गागराचे पूजन करीत आदरांजली वाहिली.

शहीद विर बाबुराव शेडमाके यांनी या देशासाठी अगदी कमी वयात आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांचे बलिदान कदापी विसरता येणार नाही, आदिवासी समाजाने त्यांचे स्मरण करून प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती करावी हीच त्यांचा प्रती खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन ह्यावेळी राजेंनी केले.

यानंतर अहेरी शहराचा मुख्य मार्गाने राजेंचा उपस्थितीत भव्य रैली काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी जय पेरसापेन गोंड समाज तथा शहीद विर बाबुराव स्मारक समिती, अहेरीचा पदाधिकारी तथा सदस्यांनी परिश्रम घेतले.

Latest Posts

Don't Miss