Latest Posts

शक्तीवंदन पद यात्रेला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीता हिंगे

– भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे आयोजित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (gadchiroli) : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आयोजित शक्तीवंदन पद यात्रेचे आयोजन आज ५ मार्च रोज मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. या शक्तीवंदन पद यात्रेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीता हिंगे यांनी केले आहे.

या यात्रेचे शुभारंभ खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजभे, जेष्ठ नेते लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा प्रमुख किशन नागदेवे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष मोती कुकरेजा, जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी यांच्या हस्ते होणार आहे.

Latest Posts

Don't Miss