Latest Posts

श्रीरामपूर माँ काली पूजा महोत्सवाला माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील श्रीरामपूर येथील आज श्रीश्री माँकाली पूजा महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या काली महापूजा महोत्सवला आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून विधिवत पूजा अर्चना करून काली मताचे दर्शन घेतले.

काली माता मंदिर दुरुस्तीसाठी अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत देण्यात आली. त्यावेळी अजय कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सुख समृद्धी आनंदी जीवन लाभो ही काली मताची दर्शन घेतांना चरणी प्रार्थना केली.

यावेळी सुखदेव भैय्या, कमलेश सरकार, विजू हलदार, समीर बिश्वास, राजू दुर्गे, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच काली पूजा महोत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य व गावकरी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss