Latest Posts

वर्धा : जिल्ह्यात सिकलसेलचे १४ हजार ७६२ वाहक व १ हजार १९२ रुग्ण

– सिकलसेल जनजागृती अभियान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : सिकलसेल करीअरच्या माध्यमातुन हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो. तेव्हा सिकलसेल समुळ उच्चाटन करायचे असेल तर विवाह योग्य मुलामुलींची सिकलसेल स्क्रीनींग करावे. सिकलसेल हा अनुवंशिक आजार आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये १४ हजार ७६२ सिकलसेलचे वाहक आढळून आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

यामध्ये वर्धा तालुक्यात ४०४ रुग्ण व ५ हजार २० वाहक, सेलू तालुक्यात १५५ रुग्ण व १ हजार ८९२ वाहक, देवळी १०३ रुग्ण व १ हजार ४४१ वाहक, आर्वी १६ रुग्ण व १ हजार ३९४ वाहक, आष्टी ३१ रुग्ण व ३४७ वाहक, कारंजा २६ रुग्ण व ४१५ वाहक, हिंगणघाट २४६ रुग्ण २ हजार ११९ वाहक, समुद्रपूर ११७ रुग्ण व २ हजार १३४ वाहक असे एकुण १ हजार १९२ सिकलसेलचे रुग्ण असून १४ हजार ७६२ वाहक असल्याची नोंद आहे.

नियमित आरोग्य तपाणी करावी –
जवळच्या नात्यात लग्न करु नका सिकलसेल असेल तर लपवु नये. नियमित आरोग्य तपासणी करा व हिमोग्लोबिनची पातळी बरोबर ठेवण्यासाठी संतुलीत आहाराचे सेवन करावे. फॉलिक ॲसिडच्या गोळ्या नियमित घ्याव्या. परंतु अनेक  लोक याकडे दुर्लक्ष करतात. सिकलसेल आजारा विषयी लोकांमध्ये जनजागृती केली जाते. तसेच तपासणीची सुविधा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे.

रक्त तपासणी अनिवार्य –
सिकलसेल स्क्रीनींग : सिकलसेल आजाराची तपासणी सर्व प्राथमिक आरोगय केंद्र, सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय व आपले दवाखाने येथे करण्यात येते.

संपूर्ण आरोग्य तपासणी : जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्या मार्फत सिकलसेल सोल्युबिटी तपासणीसह अनेक आरोग्य विषयक तपासण्या करण्यात येतात. प्राथमिक आरोग्य  केंद्रातील गाव पातळीवर आरोग्य सेविका व आशा सेविका यांच्या मार्फत रक्त तपासणी व समुपदेशन निशुल्क करण्यात येत आहे.

नात्यात लग्न टाळावे –
सिकलसेल हा अनुवंशिक आजार असल्याकारणाने लग्न ठरवितांना नात्यात लग्न करणे टाळावे. कारण जर घरातील मुलगा व मुलगी यांच्या दाम्पत्यापैकी कुणालाही हा आजार असेल तर त्यांना किंवा त्यांच्या होणाऱ्या अपत्याला हा आजार होण्याची दाट शक्यता असते.

आरोग्य कुंडली पाहली तर –
जातपात, धर्मवंश पाहण्यापेक्षा मुलामुलीची आरोग्य कुंडली पाहणे गरजेचे आहे. जेणेकरुन आपण ज्या व्यक्तीशी लग्न करतो तो व्यक्ती आजारी तर नाही याची माहिती मिळेल. कुंडलीचे ३६ गुण जोडण्यापेक्षा आरोग्य गुण जुडल्यास आयुष्यभर निरोगी जोडपे  राहतील. व त्यातुन त्यांचा आर्थिक विकास देखील होईल. यासाठी आरोग्य चाचणी करुनच लग्न करण्याची परंपरा सुरु करावी. सिकलसेल हा अनुवंशिक आजार आहे. हा एका पिढीतुन दुसऱ्या पिढीत जातो. तेव्हा सिकलसेलचे समुह  समुह उच्चाटन करायचे असेल तर विवाह योग्य मुलामुलींची सिकल स्क्रीनींग करा व जवळच्या नात्यात लग्न करु नका. असे आरोग्य विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss