Latest Posts

सिकंदर शेख ठरला ६६ वा महाराष्ट्र केसरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : प्रकाश उत्सव धनत्रयोदशी च्या पावन पर्वावर १० नोव्हेंबर रोजी बीटीएस प्लॉट, शिवाजी वॉर्ड, बल्लारपुर येथे चंदनसिंह चंदेल बल्लारपुर विधानसभा प्रभारी व माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य तथा हरीश शर्मा जिल्हाध्यक्ष भाजपा (ग्रामीण) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभ हस्ते स्ट्रीट लाईट व हायमास्ट चे लोकार्पण संपन्न झाले. अनेक दिवसांपासून वॉर्ड वासियांची ही मागणी पूर्णत्वास आली.

याकरिता राजू दारी यांनी वारंवार चंदन सिंह चंदेल व हरीश शर्मा यांच्याकडे सतत पाठपुरावा केला व फळ स्वरूप आज हा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी वार्डातील ज्येष्ठ नागरिकांनी चंदन सिंह चंदेल व हरीश शर्मा यांचे शॉल, श्रीफळ देऊन सत्कार केला व आभार मानले.

या प्रसंगी प्रतापसिंग कपुर, सेवासिंग कालरा, जसवंतसिंह ठाकुर, बदनसिंग दारी, रविंद्रसिंग भुये, सुरेंद्रपाल शर्मा, धर्मेंद्रसिंग कपुर, मुन्ना ठाकुर, किशोर भाटिया, बिन्नी को, शंकरसिंह ठाकुर, तेजिंदर दारी, हरींदरसिंग दारी, राजु पाटील, सुरेंद्र राणा, नंदीपाल शर्मा,देवेंद्र वाटकर, विशांक ठाकुर, आशु तिवारी, राहुल कोत्तावार, सचिन राऊत, रामा गुंजेवार व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss