Latest Posts

सिंदेवाही : वनकर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही (Sindevahi) : सिंदेवाही तालूक्यात शनिवार ६ एप्रिल रोजी कच्चेपार गावातील वनकर्मचाऱ्यानी सकाळी साडेपाच वाजताचे सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गळफास घेणारे महादेव मसाजी मेश्राम (५४) असे वनकर्मचाऱ्याचे नाव आहे.

माहितीनुसार, महादेव मसाजी मेश्राम (५४) हे कच्चेपार येथील वनविभागाच्या कुटीमध्ये (रोपवाटिका) वनकर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांना पोटाचे विकार मागील दहा- पंधरा वर्षांपासून होते. त्यामुळे त्यांच्या पोटाचे दोन-तीनदा ऑपरेशन सुद्धा करण्यात आले होते. परंतु, वेदना असह्य झाल्याने ते आजाराला कंटाळून गेले. त्याचप्रमाणे आजारपणात सुद्धा ते कामावर जात होते. याच नैराश्यातून मानसीक व शारीरिक आजाराला कंटाळून कच्चेपार येथील वनविभागाच्या कुटीमध्ये (रोपवाटिका) लोखंडी रॉडला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

या घटनेची माहिती सिंदेवाही पोलिस स्टेशनला मिळताच सिंदेवाही पोलीसांनी व वनकर्मचाऱ्यानी घटनास्थळ गाठून विनोद बावणे सहायक फौजदार, आत्राम पो. कर्मचारी, जांभुळे यांनी पंचासमक्ष पंचनामा करून मृतकाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रूग्णालयात वनविभागाच्या वाहनाने पाठविण्यात आले. पंचनामा करतेवेळी दत्तु हटवादे पोलीस पाटिल कच्चेपार, गडपायले क्षेत्र. सहाय्यक तथा वनकर्मचारी वृंद उपस्थित होते. मृत व्यक्तीच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

Latest Posts

Don't Miss