Latest Posts

सिंदेवाही : वाघाच्या हल्ल्यात म्हशीने वाचविले मालकाचे प्राण, मालक गंभीर जखमी

– तांबेगडी मेंढा उपवनक्षेञातील घोट येथील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही (Sindevahi) : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील तांबेगडी मेंढा उपवनक्षेञातील घोट येथे वाघाने हल्ला करून गुराख्यास गंभीर जखमी केल्याची घटना काल २४ सप्टेंबर २०२३ ला सायंकाळच्या सुमारास घडली.

माहितीनुसार, घोट येथील मोरेश्वर लालाजी कावळे (३९) हे नेहमी प्रमाणे आपल्या म्हशी जंगलात चारावयास गेले होते. सायंकाळीच्या सुमारास गावाकडे परत येत असताना वाघाने गुराख्यावर जोरदार हल्ला करून गंभीर जखमी केले. मालकावर वाघाने हल्ला चढवल्याचे लक्षात येताच सर्व चरत असलेल्या म्हशाने वाघावर हल्ला करत वाघाला पिटाळून लावले.

सदर घटनेची माहिती मिळताच वनविभाग तांबेगडी मेंढाचे वनपाल बुरांडे व वनरक्षक सोरते यांनी गुराख्यास तातडीने सामान्य रुग्णालय सिंदेवाही येथे भरती केले. सध्या गुराख्यावर उपचार सुरू असून गुराखी गंभीर जखमी आहे.

Latest Posts

Don't Miss