Latest Posts

सिरोंचा स्पोर्ट अकॅडमी तर्फे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

– माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते उदघाटन संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : सिरोंचा स्पोर्ट अकॅडमी तर्फे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिरोंचा तालुका मुख्यालयात दरवर्षी सिरोंचा स्पोर्ट अकॅडमी तर्फे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून या स्पर्धेसाठी ३३ हजार ३३३ प्रथम पारितोषिक आणि २२ हजार २२२ द्वितीय पारितोषिक ठेवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यातील क्रिकेट चमुनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. विजेते व उपविजेते संघांना आकर्षक बक्षीस आणि शिल्ड देण्यात येणार आहे.

या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी स्वतः क्रिकेट खेळत जोरदार फटकेबाजी केले. त्यामुळे खेळाडूंमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झाला. यावेळी स्पर्धेत सहभाग झालेल्या संघांना त्यांनी शुभेच्छा दिले.

Latest Posts

Don't Miss