Latest Posts

….तर ग्रामीण भागातूनही उत्कृष्ट खेळाडू घडतील : माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम

– देचली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : शहरासारखे सोयी-सुविधा, उत्तम मैदान नसतानाही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ग्रामीण भागातील तरुण विविध क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतात. एवढेच नाहीतर योग्य मार्गदर्शन नसतानाही ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये चांगला खेळ करण्याची प्रचंड क्षमता आहे. जर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातूनही उत्तम खेळाडू घडतील असा आशावाद माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केला.

शहीद पोलीस उपनिरीक्षक शशांक मलकापुरे यांच्या स्मरणार्थ देचली येथे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून सीआरपीएफ चे असिस्टंट कामंडन्ट मोहम्मद शकील, प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी अधिकारी संजय तडवी, पीएसआय भारते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, ऍड. पंकज दहागावकर, ग्रामपंचायत सदस्य हेमराज कुमरे, म हेश पुप्पाला, तिरुपती सुंकरी, सतीश पणेला, सतीश कारेंगुला, रमेश आकुला, ताजु कुळमेथे, मखमुर शेख आदी उपस्थित होते.

देचली येथील भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याकडून ४१ हजार रुपयांचा पारितोषिक, शहीद पोलीस उपनिरीक्षक शशांक मलकापुरे यांच्या स्मरणार्थ देचली पोलीस स्टेशन तर्फे ३१ हजार रुपयांचा द्वितीय तर ग्रामपंचायत सदस्य हेमराज कुमरे यांच्याकडून २१ हजार रुपयांचा पारितोषिक व आकर्षक शिल्ड देण्यात आले. त्यामुळे याठिकाणी परिसरातील बरेच चमुनीं सहभाग घेतला.

दरम्यान गावात आगमन होताच सम्राट सी सी देचली तर्फे पाहुण्यांचा भव्य स्वागत करण्यात आले. थोर महातम्यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनतर उदघाटनिय सामन्यात मान्यवरांनी स्वतः मैदान गाजविले.

Latest Posts

Don't Miss