Latest Posts

आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारापेक्षा समाजाने केलेला सत्कार हा सर्वात मोठा पुरस्कार : गीता हिंगे 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी गाणली समाज व शिक्षण मंडळातर्फे कोजागिरी निमित्य आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा तथा भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा गीता हिंगे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावर अध्यक्ष स्थानी गाणली समाज शिक्षण व कल्याण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश तोडेवार होते. प्रमुख अतिथी म्हणून विजया पोरेड्डीवार, अशोक चन्नावार, सुरेश सावकार पोरेड्डीवार, सचिव रविंद्र अयतुलवार उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आतापर्यंत अनेक पुरस्कार मला मिळाले परंतु समाजाने केलेला सत्कार हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे असे गीता हिंगे म्हणाल्या. आपण या पृथ्वीवर जन्माला आलो तेव्हा समाजाचे काही देणे लागतो. आपल्या समाजातील दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी, गरजूंसाठी समाजाने पुढाकार घ्यायला पाहिजे असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या कार्यक्रमाला समाजातील विविध मान्यवर तसेच गडचिरोलीतील गाणली समाजातील बंधू भगिनींची चारशे पाचशे च्या संख्येनी उपस्थिती होती.

Latest Posts

Don't Miss