Latest Posts

अहेरीत होणार धर्मरावबाबा आत्राम दिलों के राजा प्रदर्शित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या ४० वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर आधारित माहितीपट अहेरीत ७ जून ला धर्मरावबाबा आत्राम दिलों के राजा प्रदर्शित होत आहे. धर्मरावबाबा आत्राम यांचं बालपन, गडचिरोलीतील आदिवासींचं जीवनमान उंचलण्यासाठी त्यांनी केलेले सामाजिक कार्य, त्यांच्या नक्षल अपहरणाचा थरार, लोहखनिज प्रकल्पातून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात उद्योगाची नवी पाहट, त्यांच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास या माहितीपटातून गडचिरोलीत उलगडणार आहे.

धर्मरावबाबा आत्राम दिलों के राजा या माहितीपटाचा ट्रेलर गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत लाँच झाला. या ट्रेलरमधून कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या जीवनातील संघर्षमय प्रवास जनतेने बघितला. वयाच्या १४ व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपल्यानंतरचा त्यांचा संघर्ष, तर ते पहिल्यांदा आ. म्हणून निवडून आल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांचे केलेले अपहरण, हा खडतर व कठीण काळ बाबांनी  बगीतला. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बाबा म्हणतात जेव्हा नक्षलवादी माझंअपहरण करण्यासाठी आलेत, तेव्हा माझ्या सोबत अनेक लोक होती पण मी सर्वांना सांगितलं की हा संघर्ष माझ्या एकट्याचा आहे. जे होईल ते बगु, पण तुम्ही सुखरूप घरी जा असा नेता परत होणे नाही. धर्मरावबाबा म्हटलं की आपल्या डोळयासमोर हेच मोजके क्षण येतात, पण या व्यतिरिक्त या जीवनपटात त्यांनी केलेली अनेक जनहिताची कामे दाखवण्यात आली आहेत.

गडचिरोली हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण आता हा जिल्हा प्रगतीच्या वाटेवर आहे. येथे कधीकाळी ना उत्पन्नाचे साधन होते ना व्यवसायाचे काही मार्ग. हा एक असा जिल्हा जेथे गुंतवणूकदार तर नाहीच पण सरकार सुद्धा लक्ष देत नव्हतं. पण काळ बदलला, आज गडचिरोली जिल्ह्यात सुरजागडसारखे खनिज प्रकल्प मंत्री धर्मरावबाबांनी आणलेत. एक काळ होता जेव्हा येथील स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन म्हणून फक्त तेंदूपत्ता तोडणे हेच पोट भरण्याचं साधण होते. पूर्वी एका आदिवासी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे केवळ १५ हजार रुपये होते. आज तेच कामगार सुरजागड सारख्या प्रकल्पात जेव्हा काम करताय, त्यांना १५ हजार रूपये मासिक उत्पन्न मिळतंय. नॉन इंडस्ट्रियल लॅण्ड म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आज इंडस्ट्रियल लॅण्ड म्हणून याच मायभूमीत उदयास आला आहे. येथे अनेक उद्योगपती गुंतवणूक करतायेत. हा कायपालाट बाबांनी केलाय, यासोबतंच राज्यातील अनेक ऐतिहासिक निर्णय बाबांनी घेतले.

अनुदानित आदिवासी आश्रमशाळा ही संकल्पनाच मंत्री धर्मरावबाबांची होती आणि आज संपूर्ण राज्यात याच संकल्पनेमुळे अनेक आदिवासी विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, सीए व अनेक अशा बड्या पदावर कार्यरत आहे.

मागासवर्गीय जनतेसाठी अनुदानित शाळा व उद्योगासाठी राइसमिल, नवीन तालुक्याची निर्मिती, प्रशस्त शासकीय रुग्णालय, स्वतंत्र ऑक्सिजेन निर्मिती प्लांटस, चांगले रस्ते, वीज, ठिकठिकाणी पीएचसी सेंटर, रुग्णवाहिका, गोंडवाना सैनिकी विद्यालय, १०० बेड्सचे नवीन रुग्णालय, अशा अनेक योजना, आदिवासींच्या जीवनात नवी विकासाची वाट घेऊन आली. आणि हिच मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची ओळख आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुनानता आपल्या आदिवासींसाठी आयुष्य खर्ची घालणारा हा नेता आजही आदिवासींच्या मनात घर करून बसलाय.

Latest Posts

Don't Miss